सोलापुरातील दुकाने रात्री 10 नंतर बंद! पोलिस उपायुक्तांच्या नेतृत्वात रात्रगस्त; विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई, रात्री 9 ते 10 या वेळेत गणेशोत्सव मंडळांना भेटी

सोलापूर शहरातील दुकानांसाठी रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी असल्याने त्यांना दहानंतर दुकाने सुरू ठेवता येणार नाहीत (अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून), असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत रात्रगस्त सुरु आहे.
solapur city police
solapur city policesakal
Updated on

सोलापूर : शहरातील दुकानांसाठी रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी असल्याने त्यांना दहानंतर दुकाने सुरू ठेवता येणार नाहीत (अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून), असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे उत्सव काळात रात्री दहानंतर विनाकारण रस्त्यांवरून फिरणाऱ्यांवरही पोलिस कारवाई करणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांनी रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत रात्रगस्त सुरु केली आहे.

सोलापूर शहर उत्सवप्रिय शहर असल्याचे म्हटले जाते. पण, रात्री साडेदहा, अकरानंतर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांची संख्याही सोलापूर शहरात लक्षणीय आहे. याशिवाय रात्री अकरा, साडेअकरापर्यंत चौकातील दुकाने, हातगाडे, पानटपऱ्या उघड्या असतात. त्यावर आता पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.

कायदा व सुव्यवस्थेसाठी शहरातील गस्त वाढविली आहे. तीन पोलिस उपायुक्त, चार सहायक पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी म्हणजेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्यासह पोलिस अंमलदारांवर त्याची जबाबदारी आहे. याशिवाय वाहतूक पोलिस अधिकारी व अंमलदार देखील विविध रस्त्यांवर रात्री उशिरा वाहनांमधून फिरणाऱ्यांची तपासणी करतील. त्यावेळी बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वस्तूंची खरेदी किंवा अन्य कामे रात्री दहापूर्वीच करावी, विनाकारण कोणीही फिरू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. गणपती विसर्जनादिवशी रात्री बारापर्यंत परवानगी असणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

शहर पोलिसांचे नियोजन

  • संपूर्ण शहरात रात्री ९ ते १२ या वेळेत पोलिसांची राहणार गस्त

  • शॉप ॲक्टनुसार रात्री दहानंतर शहरातील सर्व दुकाने बंद करावी लागणार

  • रात्री ९ ते १० या वेळेत सर्व पोलिस अधिकारी गणेशोत्सव मंडळांना भेटी देतील

  • रात्री १० नंतर दुकाने बंद करण्याची कार्यवाही; १२ पर्यंत शहरभर पोलिसांची गस्त

दररोज एका ‘डीसीपीं’वर जबाबदारी

उत्सव काळात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या, दंगा- मस्ती करणाऱ्यांवर पोलिस आता कारवाई करत आहेत. शहरातील दुकानांसाठी रात्री दहापर्यंतच परवानगी असून त्यानंतर सुरु राहणाऱ्या दुकानांवर, त्याठिकाणी विनाकारण थांबणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार आहे. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी त्याची जबाबदारी दररोज एका पोलिस उपायुक्तांवर दिली असून ते स्वत: शहरातील ठिकठिकाणी जाऊन पाहणी करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.