मोठी बातमी : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाइन

All state university exams offline
All state university exams offlineAll state university exams offline
Updated on

नागपूर : राज्यात कोरोनाची लाट जवळपास संपली आहे. सर्व विद्यापीठातील परीक्षा (exam) ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे सोमवारी त्यांनी ऑनलाइन बैठकीत सर्व विद्यापीठांशी संवाद साधला. त्यानंतर हा निर्णय घेतल्याचे समजते. यावेळी जून महिन्यांपर्यंत सर्व परीक्षा संपविण्याचेही आदेश त्यांनी दिले. (All state university exams offline)

राज्यात आतापर्यंत कोरोनाची लाट होती. मात्र, दीड महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणिय घट झालेली आहे. त्यामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता महाविद्यालये ऑफलाइन सुरू असताना विद्यापीठांद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे.

All state university exams offline
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन डबल मर्डर प्रकरणातून निर्दोष मुक्त

याबाबत विद्यार्थी संघटनाही आक्रमक असल्याचे दिसून आले. त्यातून काही विद्यापीठाद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्याचे ठरविले. मात्र, सोमवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन परीक्षांचा (exam) आढावा घेतला. त्यात त्यांनी सर्व विद्यापीठांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत सूचना केली आहे. बैठकीमध्ये सर्व कुलगुरूंनी तयारी दर्शविल्याचेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विद्यापीठात ऑनलाइन परीक्षा?

राज्यात ऑफलाइन परीक्षा घेण्याचे ठरले असताना दोन दिवसांपूर्वी विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा घेण्याचे परीक्षा मंडळाच्या बैठकीत ठरविले. मात्र, त्याबाबत अद्याप नोटीफिकेशन काढण्यात आलेले नाही. आता ऑफलाइनचा निर्णय आल्याने पुन्हा एकदा या निर्णयावर विचार करावा लागणार आहे. त्यामुळे या निर्णयावर चर्चा करण्यासाठी विद्यापीठाला विद्वत परिषदेची बैठक बोलवावी लागणार आहे.

विद्यार्थी पुन्हा संभ्रमात

एकीकडे विद्यापीठांनी मे महिन्यात परीक्षा घेण्याची घोषणा केली. ती ऑनलाइन असल्याचेही स्पष्ट केले. आता पुन्हा ऑफलाइन घेण्यावर चर्चा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठाने दोन्ही पर्याय दिले आहेत.

All state university exams offline
सोमय्या हल्ला; माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक आणि सुटका

विद्यार्थी संघटना पुन्हा करणार विरोध

राज्यातील महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या विभागांमध्ये सगळीकडे ऑनलाइन शिक्षण देण्यात आले असताना ऑफलाइन परीक्षा घेऊ नये अशी भूमिका विद्यार्थी संघटनांनी घेतली होती. मात्र, आता पुन्हा ऑफलाइन परीक्षेचा सुर आवळल्याने विद्यार्थी संघटनांकडून आंदोलनाचा पवित्रा स्वीकारण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यापीठ व विद्यार्थी संघटना एकमेकांविरोधात उभ्या ठाकणार असल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.