Ajit Pawar-Devendra Fadnavis
Ajit Pawar-Devendra Fadnavisesakal

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केले. संचिन घोटाळ्यावर त्यांनी सविस्तर सांगितले. तसेच महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती सांगितली.
Published on

Devendra Fadnavis:

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडामुळे एकाच पक्षाचे दोन गट निर्माण झाले. शिवसेनेत आधी एकनाथ शिंदे नंतर राष्ट्रवादीत अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा दिला. यावेळी अनेक टिका देखील झाली. ज्या भाजपने अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले. त्यांना सोबत घेतल्याने भाजपचा स्वाभीमानी वर्ग नाराज होता. दरम्यान या सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार, सुनील तटकरे व अन्य नेत्यांवर सिंचन घोटाळ्याप्रकरणी केलेले आरोप चुकीचे नव्हते. विदर्भ-कोकण सिंचन महामंडळ व अन्य काही प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. तर काही जणांवर आरोपपत्र देखील दाखल झाले होते. सिंचनाबाबत कंत्राटे देताना अटी आणि नियम बदलण्यात आले होते. या खात्याचे अजित पवार प्रमुख म्हणून आम्ही त्यांच्यावर आरोप केले होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार, सुनील तटकरे व अन्य नेत्यांवर सिंचन घोटाळ्याप्रकरणी केलेले आरोप चुकीचे नव्हते. विदर्भ-कोकण सिंचन महामंडळ व अन्य काही प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. तर काही जणांवर आरोपपत्र देखील दाखल झाले होते. सिंचनाबाबत कंत्राटे देताना अटी आणि नियम बदलण्यात आले होते. या खात्याचे अजित पवार प्रमुख म्हणून आम्ही त्यांच्यावर आरोप केले होते.

सिंचन घोटाळ्याचे २०१० व २०१४ ला मी आरोप केल्यानंतर तपास यंत्रणांनी चौकशी केली. तेव्हा या घोटाळ्यात अजित पवार यांचा हात असल्याचे तपास यंत्रणांना दिसून आले नाही. प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत देखील तपासात काही दिसलं नाही. तपास यंत्रणांवर आपल्याला विश्वास ठेवायला हवा, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar-Devendra Fadnavis
Loksabha Election : पहिल्या चार टप्प्यांत ६६.९५ टक्के मतदान ; अधिकाधिक मतदानाचे आयोगाचे आवाहन

मराठा आणि ओबीसी यांच्यात जातीय ध्रुवीकरण-

मराठा आणि ओबीसी यांच्यात जातीय ध्रुवीकरण मराठवाडा विभागात 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान स्पष्टपणे दिसून आला आणि राज्याच्या सामाजिक जडणघडणीसाठी हानिकारक, असल्याचे मत देखील फडणवीस यांनी व्यक्त केली.

फडणवीस म्हणाले, मराठवाड्यातील काही भागांतील जातीय संघर्ष हा सध्याच्या निवडणुकीतील सर्वात त्रासदायक बाब आहे. असा विकास राज्यासाठी शुभ नाही. माझी चिंता मतदानानंतरची आहे. निवडणुका झाल्या की कोणी कोणासाठी काम केले याचे विश्लेषण प्रक्रिया सुरू होईल. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अधिक सतर्कतेची गरज आहे.

उद्धव ठाकरेंवर केली टीका -

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरे ज्या प्रकराची भाषा वापरतात ते राष्ट्रीय नेते नव्हे तर गल्लीतील बनले आहेत. मतांची तूट भरून काढण्यासाठी, अल्पसंख्याकांना खूश करण्यासाठी ते भलत्याच मार्गाने जात आहेत. त्यांच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे लावले गेले. बाळासाहेब ठाकरे असताना असा प्रकार मी कधीच बघितला नाही."

Ajit Pawar-Devendra Fadnavis
धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.