Almatti Dam : 'ही' दोन धरणं सांगली-कोल्हापूरसाठी धोक्याची, कृष्णा खोऱ्यालाही महापुराचा धोका; कृती समितीचं CM शिंदेंना आवाहन

राज्य शासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही - महापूर नियंत्रण कृती समिती
Eknath Shinde Almatti Dam
Eknath Shinde Almatti Damesakal
Updated on
Summary

सध्या 'अलमट्टी'त कमाल पाण्याची उंची ५१९.६० मीटर आणि व साठा १२३.०८ टीएमसी आहे.

सांगली : कर्नाटकातील (Almatti Dam Karnataka) अलमट्टी व हिप्परगी या दोन्ही धरणांतील (Almatti Dam) सध्याचा पाणीसाठा केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन करणारा असून अचानक पाऊस झाला तर सांगली, कोल्हापूरसाठी हे धोक्याचे आहे.

राज्यस्तरीय बैठकीत ठरल्याप्रमाणे या धोक्याबाबत कर्नाटक शासनास तातडीने पत्रव्यवहार करून या दोन्ही धरणांतील पाणीसाठा नियमानुसार करण्यास भाग पाडावे, असे आवाहन महापूर नियंत्रण कृती समितीतर्फे विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना निवेदनाद्वारे केले आहे.

Eknath Shinde Almatti Dam
Satara : महापुरुषांची बदनामी करण्‍याचं धाडस होतंच कसं? अशा अपप्रवृत्ती ठेचल्‍याच पाहिजेत; उदयनराजेंचा कोणाला इशारा?

निवेदनात म्हटले आहे, की या दोन्ही धरणांमधील अतिरिक्त पाणीसाठ्यामुळे व कमी विसर्गामुळे सांगली, कोल्हापूरसह कृष्णा खोऱ्यात महापुराचा धोका उद्भवतो. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत तरी या दोन्ही धरणांत कमाल पाणीसाठा करायचा नाही, असे केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निश्चित केले आहे.

Eknath Shinde Almatti Dam
Prithviraj Chavan : गद्दारांना हाताशी धरून मोदी सरकारनं महाराष्ट्र लुटलाय; माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

गेल्या २ ऑगस्टच्या जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर यांच्या उपस्थितीत झालेल्या व्यापक बैठकीतही या संदर्भात चर्चा झाली. त्यासाठी कर्नाटकच्या जलसंपदा विभागाशी समन्वय साधण्याचे आश्वासन श्री. कपूर यांनी दिले होते. त्यांच्याशी पत्रव्यवहाराचा निर्णयही झाला होता. तथापि, त्यानंतर राज्य शासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही.

निवेदनात म्हटले आहे, की ''सध्या 'अलमट्टी'त कमाल पाण्याची उंची ५१९.६० मीटर आणि व साठा १२३.०८ टीएमसी आहे. या स्थितीतच आज त्या ५१९.६० मीटर उंची (कमाल पाणी पातळी) पर्यंत तेथे पाणी साठवले आहे. हिप्परगी धरणातही ५२४.८७ मीटर उंची (कमाल पाणी पातळी) आणि पाणीसाठ्याची कमाल मर्यादा सहा टीएमसी आहे.

Eknath Shinde Almatti Dam
Kolhapur : कोल्हापुरात समोर आला धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीचा गर्भपात? खासगी रुग्णालयातील प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

या दोन्ही ठिकाणी आत्ताच धरणे कमाल साठ्याप्रमाणे भरली आहेत. अत्यंत कमी विसर्ग आहे. पावसाचा अंदाज सांगता येत नाही. अचानक पाऊस झाला तर पुन्हा महापुराचा धोका संभवू शकतो. केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालनाची त्या शासनाला तत्काळ जाणीव करून द्यावी.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.