Sharad Pawar: "जेव्हा सत्ताधारी पक्षातलेच आमदार आपापसात भिडतात"; प्रति, महायुती सरकारला विधिमंडळाच पत्र!

Sharad Pawar: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटातील राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधानभवनाच्या लॉबीत बाचाबाची झाली.
Sharad Pawar group letter to ruling MLA
Sharad Pawar group letter to ruling MLAesakal
Updated on

Sharad Pawar: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटातील राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधानभवनाच्या लॉबीत बाचाबाची झाली. यानंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधत ही घटना गंभीर असल्याचे वर्णन केले आहे.

विशेष म्हणजे हे दोन्ही नेते शिंदे गटाचे असून विधानभवन संकुलात जात असताना त्यांच्यात वादावादी झाली होती. मंत्री भुसे आणि आमदार थोरवे यांच्यात बाचाबाची झाली असता, अन्य मंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेनेचे प्रमुख व्हीप भरत गोगावले वाद मिटवला. मात्र विधीमंडळ संकुलात सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांमध्ये अशी भांडणे होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने देखील टीका केली आहे. शरद पवार गटाने एक पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. रस्त्यावरचं गँगवॉर आता प्रतिभावान राजकीय परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पायऱ्या चढून लॉबीपर्यंत येऊन पोहोचलं, असल्याचे शरद पवार गटाने म्हटले आहे.

Sharad Pawar group letter to ruling MLA
Anant Radhika Pre Wedding : अनंत-राधिकाच्या प्रीवेडिंग! मुंबई इंडियन्सचा 'माजी' कर्णधार रोहितही पोहचला जामनगरमध्ये

शरद पवार गटाचे पत्र -

प्रति, महायुती सरकार...

स.न.वि.वि.

सन्माननीय आमदारांनो... मी विधिमंडळाची इमारत बोलतेय... आजवर मी अनेक सरकारी पाहिलीत.... पण माझा अवमान करणारे सरकार पहिल्यांदाच पाहतेय. तुम्ही मला या महाराष्ट्राच्या लोकशाहीचं एक पवित्र स्थान म्हणता. पण आज हेच स्थान कलुषित झालं. जेव्हा सत्ताधारी पक्षातलेच आमदार आपापसात माझ्या आवारात भिडू लागले. महाराष्ट्राने मोठ्या आशेने तुम्हाला निवडून दिलं. फोडाफोडीचं राजकारण करून असंविधानिकपणे तुम्ही सत्तेतही आलात.

पण कै. यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या आदर्श राजकीय परंपरेला काळीमा फासण्याचं काम तुम्ही केलं, माझ्या भिंतींनाही महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाचा स्वाभिमान आहे. सबंध महाराष्ट्र मोठ्या आशेनं माझ्याकडे पाहतो. पण जेव्हा रस्त्यावरचं गँगवॉरच माझ्या आवारात घडतं, तेव्हा गेली अनेक वर्ष बाळगलेल्या माझ्या स्वाभिमानालाच तडा जातो. महाराष्ट्राच्या जडणघडणीची साक्ष म्हणजे मी आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण बदलाचे निर्णय झाले ते माझ्याच आवारात....

मग तो महिला सक्षमीकरणासाठी ३३ टक्के आरक्षणाचा असो की वडिलांच्या मालमत्तेत मुलीला समान अधिकार देण्याचा... मग तो लाखो रोजगार उपलब्ध करून देणारा एमआयडीसी निर्माणाचा असो की, आयटी पार्कचा..., मग तो सर्व शिक्षा अभियानाचा असो की, व्यावसायिक शिक्षणाचा, दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी फोर्स वनच्या स्थापनेचा असो की, महाराष्ट्र जलसिंचनाने सुजलाम सुफलाम करण्याचा, शेतकरी समृध्दीचा की डान्सबार बंदीचा असे कित्येक सर्वसमावेशक हिताचे निर्णय घेतले गेले ते माझ्याच आवारात. पण आजचं सरकार निर्णय घेतंय ते आपल्या महाराष्ट्रासाठी नव्हे तर, दिल्लीच्या आणि गुजरातच्या हितासाठी. (Latest Marathi News)

विधिमंडळ म्हणून मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे पण तुम्ही सत्तेवर आलात आणि माझ्याच आवारात कार्यरत आहात ते स्वतःच्या मंत्रीपदाचे, खुर्चीचे आणि सत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी. माझ्याच आवारातल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ जाऊन आपण अभिवादन करता, पण इमारतीत येऊन मात्र गँगवॉर करता! आज भर अधिवेशनादरम्यान महायुतीच्या आमदारांमध्ये झालेली बाचाबाची पाहिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहेब व सुप्रसिध्द दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या तत्कालीन उपपंतप्रधान यशवतंराव चव्हाणांसोबतच्या भेटीची गोष्ट सांगाविशी वाटते. त्यावेळी कै. चव्हाण साहेब जब्बार पटेल यांना म्हणाले.

"जब्बार फार मुश्किलीने या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्यासाठी अनेक लोकांचे बळी गेलेत.

विधानसभेत जे काम चालतं ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानानुसार चालतं. त्या सभागृहाला एक 'डिग्निटी' असते. जेव्हा तुम्ही सिनेमा कराल तेव्हा सभागृहाची डिग्निटी विसरू नका." जब्बारांनी रिल्स लाईफच्या माध्यमातून ही 'डिग्नीटी' जपली. परंतु तुम्ही सत्ताधा-यांनी रिअल लाईफमध्ये 'माझी' डिग्नीटी धुळीस मिळवली आहे, याचं वाईट वाटतं!

आपला, महाराष्ट्र राज्य विधिमंडळ

Sharad Pawar group letter to ruling MLA
Water Survey: 485 पैकी फक्त 46 शहरे पिण्यायोग्य पाणी पुरवतात; सरकारी सर्वेक्षणात धक्कादायक माहिती, पुण्यात परिस्थिती काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()