IIT, IIM, NIT मध्ये न शिकताही मिळाला Amazon मध्ये जॉब, नाशिकचा अनुराग झाला झटक्यात करोडपती

नाशिकच्या अनुराग मकाडेला मिळालं सव्वा कोटींचे पॅकेज.
Amazon Job
Amazon Jobesakal
Updated on

Nashik Boy Got Job In Amazon Without Studied In IIT, IIM In Marathi :

जगभरातल्या वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या अनेक मोठ्या कॉलेजेसमध्ये जाऊन प्लेसमेंट करतात. या प्लेसमेंटमध्ये मुलांना लाखो, कोटींचे पॅकेजेस ऑफर केले जातात. या प्लेसमेंट्स साठी IIT, IIM, NIT यांच्या विद्यार्थ्यांचीच नावे बहुतेकता समोर येतात. पण या विद्यार्थ्याने अशा कोणत्याही संस्थेत शिक्षण न घेताही हा मोठ्या पगाराचा जॉब मिळवला आहे.

व्यक्तीने ठरवलं तर तो काहीही करू शकतो. याचेच हे उदाहरण आहे. जर कोणत्याही चांगल्या कंपनीत जॉब मिळवण्यासाठी नामांकीत संस्थेतूनच शिक्षण घेणे गरजेचे नसते तर तुमची हुशारी आणि इच्छाशक्ती आवश्यक असते. मग तुम्ही कोणत्याही संस्थेत शिकलेले असो, हेच या उदाहरणातून स्पष्ट होते.

महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये राहणारा विद्यार्थी अनुराग मकाडेने इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT) प्रयागराज इथून बीटेक केले आहे. आणि आपल्या हुशारीच्या जोरावर त्याने अॅमेझॉनमध्ये मोठ्या पॅकेजचे म्हणजे १.२५ कोटीचे वार्षिक पॅकेज मिळवले आहे.

Amazon Job
Success Story: डुबेरेतील शेतकरी कन्या वर्षाचा लंडनमध्ये MS पदवीने सन्मान

नाशिक जिल्ह्यातल्या अनुरागने आपल्या लिंक्डइन पोस्टमध्ये आपल्या यशाविषयी लिहिले की, त्याने फ्रंट एंड इंजीनिअर म्हणून जॉइन झाला आहे. याशिवाय अलाहबादचा विद्यार्थी प्रकाश गुप्ताला गुगलमध्ये १.४ कोटींचे पॅकेज मिळाले आहे.

याशिवाय IIIT मध्ये या वर्षी अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजचा जॉब मिळू शकतो. यात ५ विद्यार्थ्यांना १ कोटींपेक्षा जास्त पॅकेज मिळाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()