Maharashtra Politics : ठाकरेंच्या उर्दू बॅनरचा वाद पेटला! ठाकरे गटाकडून शिंदे-फडणवीसांना जशास तसे उत्तर

Ambadas danave post cm eknath shinde devendra fadnavis photos over uddhav thackeray malegaon sabha urdu poster
Ambadas danave post cm eknath shinde devendra fadnavis photos over uddhav thackeray malegaon sabha urdu poster
Updated on

उद्धव ठाकरे यांची आज (२६ मार्च) मालेगाव येथे जाहीर सभा होत आहे. या सभेत उद्धव ठाकरे देश आणि राज्याच्या भाषणावर काय भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून मालेगाव सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

दरम्यान उद्धव ठाकरेंच्या सभेचे मालेगावात मराठी आणि उर्दू भाषेत पोस्टर लावण्यात आले आहेत. यावरून एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. दरम्यान या टीकेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो पोस्ट करत प्रत्युत्तर दिले आहे.

Ambadas danave post cm eknath shinde devendra fadnavis photos over uddhav thackeray malegaon sabha urdu poster
Devendra Fadnavis : अली जनाब उद्धव ठाकरेंना शोभतं का? मालेगावातील सभेआधी फडणवीसांचा खोचक सवाल

फडणवीसांचा टोपीतील फोटो केला शेअर

या टीकेला उत्तर देताना शिवसेना नेते आंबादास दानवे यांनी फेसबुकवर फडणवीसांचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात फडणवीस मुस्लीम बांधवांच्या कार्यक्रमात बोलताना दिसत आहे. या फोटोला आंबादास दानवे यांनी 'जिनके घर शीशे के बने होते हैं वो दूसरों पर पत्थर नहीं फेंकते…' असे कॅप्शन देत फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

Ambadas danave post cm eknath shinde devendra fadnavis photos over uddhav thackeray malegaon sabha urdu poster
Pune Crime News : पुण्यात पोलिसांचा धाक संपला? उपआयुक्तालयापासून १०० मीटर अंतरावर फोडली वाहने

मुख्यमंत्र्यांचे उर्दूतील पोस्टर

शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेलाही आंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दानवे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंच एक उर्दूतील पोस्टर फेसबूकवर पोस्ट केले आहे. जनाब एकनाथ शिंदे ये भी देख लो…. असे कॅप्शन देत त्यांनी आधीत हे पाहा आणि नंतर उध्दवसाहेबांवर टीका करा असे म्हटले आहे. तसेच तुमची तेवढी पात्रता नाही असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

फडणवीस काय म्हणाले होते..

उर्दू भाषेत लागलेल्या या बॅनवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अली जनाब वगैरे जे काही आहे ते उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटतं का? हे त्यांना विचारा. उर्दू ही एक भाषा आहे, त्या भाषेमध्ये कोणी काही म्हटलं तर काही हरकत नाही. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. पण आम्ही लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन जर ते लांगुलचालन करत असतील तर त्यांना याचं उत्तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल.

तसेच शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार सभेसाठी उर्दूमध्ये बॅनर बनवतात, तसेच सभेला येण्यासाठी फतवे काढावे लागत आहेत, अशी टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.