Winter Session 2024 : शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधान परिषदेतून निलंबन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर त्यांनी पत्र लिहून निलंबनाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी सभापतींकडे केली होती.
सभापतींनी अंबादास दानवेंच्या निलंबनावर सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना निलंबनातून सूट देण्यात आलेली आहे. पाच दिवसांऐवजी केवळ तीन दिवसांच्या निलंबनाची कारवाई दानवेंवर करण्यात आली आहे. त्यामुळे आता दानवे शुक्रवारपासून विधीमंडळाच्या कामकाजात सहभाग घेतील.
अंबादास दानवे यांनी सभागृहात भाजप नेते प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. दानवेंनी असभ्य भाषेचा वापर केला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रसाद लाड यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी केली होती. त्यानंतर त्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याचा निर्णय उपसभापतींनी घेतला होता.
दरम्यान, अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, यासाठी सलग दोन वेळा उपसभापती यांच्या दालनात बैठका पार पडल्या. एवढंच नाही तर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीला उपस्थिती लावली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा केली.
अंबादास दानवे यांनी माफीचे पत्र देखील लिहिलं होते. या प्रकरणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील माफी मागितली होती. यातच कारवाई करताना दानवे यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचा आरोप आमदार अनिल परब यांनी केला होता. अखेर दानवेंच्या निलंबनामध्ये सूट देण्यात आलेली आहे. ते उद्यापसून पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.