Maharashtra Monsoon Session 2023 : 'आम्ही सरकारला…'; पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांचा एल्गार

ambadas danve leader of opposition in legislative council on  Maharashtra  legislative assembly Monsoon Session 2023
ambadas danve leader of opposition in legislative council on Maharashtra legislative assembly Monsoon Session 2023
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर उद्या महाराष्ट्र विधानसभेचे पहिले पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यंदाचं पावसाळी अधिवेशन हे मुंबईत १५ दिवस सुरू राहणार आहे. हे अधिवेशन १७ जुलै ते १४ ऑगस्ट या कालावधीत पार पडेल . दरम्यान पूर्वीचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हेच अधिवेशनाच्या तोंडावर शिंदेफडणीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे या आगामी पावसाळी अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडल्याचा विधीमंडळात अधिकृत निर्णय झाला नाहीये. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष विधीमंडळातील आसन व्यवस्था पूर्वीप्रमाणेच ठेवणार आहेत. यादरम्यान विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते यांनी आगामी पावसाळी अधिवेशनात आम्ही सरकारला सळो की पळो करणार अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ambadas danve leader of opposition in legislative council on  Maharashtra  legislative assembly Monsoon Session 2023
Maharashtra Rain Update : येत्या ४ दिवसात पावसाचा जोर वाढणार! 'येथे' बरसणार जोरदार पाऊस

अंबादास दानवे म्हणाले की, महाविकास आघाडी सर्व पक्षांची एकत्रित बैठक होईल, अधिवेशनात कोणते विषय घ्यावेत, आताचं सरकार अपयशी, कलंकित सरकार आहे. या सरकारच्या विरोधात एक व्यूहरचना रचली जाईल. संख्या कमी झाली म्हणून आम्ही सरकारला स्वस्थ बसू देऊ असे वाटण्याचं काही कारण नाही. या सरकारला सळो की पळो करुन सोडू असेही अंबादास दानवे म्हणाले.

ambadas danve leader of opposition in legislative council on  Maharashtra  legislative assembly Monsoon Session 2023
Maharashtra Politics : विरोधी पक्षनेतेपदावर पुण्यातील काँग्रेस आमदाराचा दावा; थेट पक्षाध्यक्षांना पाठवला बायोडेटा

अधिवेशनात कोणत्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरणार असे विचारले असात, मोजता येणार नाहीत येवढे विषय राज्यात आहेत. शेतकरी, युवक, महिला, ओबीसी, मराठा अशा कोणत्याही क्षेत्रात सरकारचं काम समाधानकारक नाही, असेही दानवे यावेळी म्हणाले.

विरोधकांची सभागृहातील कमी झालेल्या संख्येवर बोलताना दानवे म्हणाले की, संख्येवर काही होणार नाही, मनातील सरकारविरोधातील त्वेष, जनतेच्या प्रश्नाप्रती कळकळ आमच्या सदस्यांमध्ये आहे त्यामुळे सदस्यसंख्या कमी जास्त जरी झाली तरी विरोधीपक्ष ताकदीने लढेल असेही अंबादास दानवे म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.