Ambadas Danve : ''शेतकऱ्यांसाठी सरकारला वठणीवर आणणार'', विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बांधावर

गजानन काळुसे सिंदखेड राजाः शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकारला वठणीवर आणणार
Ambadas Danve
Ambadas DanveEsakal
Updated on

गजानन काळुसे

सिंदखेड राजाः शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकारला वठणीवर आणणार असल्याचे विधान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तालुक्यातील पळसखेड चक्का येथे केले.

गावातील नुकसान झालेल्या शेडनेटमध्ये नुकसान झालेल्या पिकांची  व कपाशीची बांधावर जावून पीक पहाणी केल्यानंतर शेतकऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधला आहे. शेतकरी लाखोंचा पोशिंदा आहे परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. गारा आणि अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले असल्यांचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.

दानवे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सिडनेटला विमाचे संरक्षण नसल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही ही दुर्दैवी बाब आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भात आवाज उठवणार आहे, मागील दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे हरभरा, कापूस, गहू व तूर यासह फळबागेच्या पिकांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Ambadas Danve
Cabinet Meeting : पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई; मंत्रिमंडळ बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय

सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या भागामध्ये गारांचा पाऊस झाला या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेल्या (सिडनेट) शेडनेट चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सिड नेटचे प्लॉट जमीन दोस्त झाले, त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचा नुकसान झाले आहे. तर सीड कंपन्यांनी सुद्धा हात वर केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी शेतकऱ्यांनीही आपल्या व्यथा विरोधी पक्ष नेत्यांसमोर मांडल्या.

येणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भात आवाज उठवणार असल्याची माहिती त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दानवेंनी दिली. या शेतकऱ्यांच्या भरोशावर सीड कंपन्या मोठ्या होतात परंतु त्यांना नुकसानीच्या काळात मदत करत नाही, यासंदर्भात हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारला प्रश्न विचारणार असून सरकारने मदतीसाठी ठोस निर्णय न घेतल्यास या संदर्भात आवाज उठविणार असल्याचे दानवे म्हणाले.

Ambadas Danve
Maharashtra Cabinet Meeting: शिंदे सरकारचे 'मुस्लिम कार्ड'... 'हा' निधी 30 कोटींवरून 500 कोटींवर

यावेळी त्यांचेसोबत उपनेते लक्ष्मण वडले, संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, जिजाबाई राठोड, बद्रीनाथ बोडखे, योगेश म्हस्के, म्हासाजी वाघ, सिध्देश्वर आंधळे, उल्हास भुसारे, अक्षय ठाकरे, उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड, तहसीलदार सचिन जैस्वाल, प्रभारी कृषी तालुका अधिकारी भागवत किंगर, ठाणेदार ब्रम्हानंद शेळके,पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना अश्रू अनावर...

विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तालुक्यातील पळसखेड चक्का गावातील शेडनेट व कपाशीची नुकसान झालेल्या पिकांची पहाणीनंतर अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या व्यस्था जाणून घेतल्या. व्यस्था मांडत असताना शेतकरी बालाजी सोसे यांचे अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळाले. स्थानिक महिला शेतकऱ्यांनी अनेक व्यथा मांडल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.