Ambadas Danve : 'शिवसेना त्या गद्दारांकडं आता ढुंकूनही पाहणार नाही'; दानवेंचा शिंदे गटावर जोरदार प्रहार

शिवसेनेकडे आज नाव, चिन्ह नाही तरीही शिवसेनेचे विरोधक आहेत - विरोधी पक्षनेते दानवे
Ambadas Danve Coffee with Sakal Activities
Ambadas Danve Coffee with Sakal Activitiesesakal
Updated on
Summary

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची वाट पाहणारेही आहेत. म्हणजेच शिवसेनेची त्यांना भीती आहे, असा टोला त्यांनी शिवसेनेच्या विरोधकांना लगावला.

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (Shiv Sena) फुटलेली असली तरी हे एक मजबूत जनाधार असलेले संघटन आहे. फुटून गेलेल्यांना आता घरवापसी नाही. त्यांच्या जागी नव्या दमाची पिढी, नवे नेतृत्व तयार झाले आहे. त्यामुळे आता शिवसेना गद्दारांकडे ढुंकूनही पाहणार नाही, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेते तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मंगळवारी (ता. आठ) ‘सकाळ’च्या मराठवाडा कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ उपक्रमात संवाद साधला. प्रारंभी निवासी संपादक दयानंद माने यांनी त्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.

Ambadas Danve Coffee with Sakal Activities
Adv Ujjwal Nikam : 'पक्षाचा व्हीप काढण्याचा अधिकार जयंत पाटलांनाच, गटनेत्यालाच आपल्याकडं वळवण्याची रणनीती'

दानवे यांनी ‘सकाळ’ सोबत आपले नाते केवळ वाचक, एक राजकारणी म्हणून एवढ्यापुरतेच मर्यादित नसून याहीपेक्षा आपलेपणाचे वेगळे नाते असल्याचे सांगितले. फुटीनंतरच्या शिवसेनेपासून मराठवाड्यातील शेतकरी, पाणीप्रश्न, इंडिया आघाडीपर्यंत अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने संवाद साधला.

शिवसेनेचे संघटन कुठेच कमी झालेले नाही. शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी येत आहेत. शिवसेनेची ताकद नसती तर असे लोक, पक्ष संघटन जोडले गेले नसते. शिवसेनेकडे आज नाव, चिन्ह नाही तरीही शिवसेनेचे विरोधक आहेत.

तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची वाट पाहणारेही आहेत. म्हणजेच शिवसेनेची त्यांना भीती आहे, असा टोला त्यांनी शिवसेनेच्या विरोधकांना लगावला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघांपैकी एक सिल्लोडचा अपवाद वगळता आम्ही कुठेच कमी झालेलो नाही आणि राज्यातदेखील हीच स्थिती आहे.

Ambadas Danve Coffee with Sakal Activities
Maharashtra Politics : 'स्वाभिमानी'तला वाद चिघळणार? तुपकरांना 15 ऑगस्टची डेडलाईन, शेट्टी मोठ्या निर्णयाच्या तयारीत!

राज्यात ३३ टक्के भागांत निधी नाही

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधीच्या कारणावरून ते आक्रमक झाले होते, याविषयी ते म्हणाले, पालकमंत्री मनमानी पद्धतीने काम करत आहेत. आम्ही सत्तेत असताना सत्ताधारी आमदाराला तीन कोटींचा निधी दिला, तर विरोधी आमदाराला दोन कोटी दिले जायचे. मात्र, विद्यमान सरकार आणि त्यांच्या पालकमंत्र्यांनी विरोधी आमदारांना निधीच न देण्याचा चुकीचा पायंडा सुरू केला आहे. राज्यातील ९० मतदारसंघांत या सरकारने विकासनिधी दिलाच नाही. टक्केवारीत हे प्रमाण काढले तर राज्याचा ३३ टक्के भाग हा या सरकारने विकासापासून वंचित ठेवला.

Ambadas Danve Coffee with Sakal Activities
Satara Politics : CM शिंदेंच्या जिल्ह्यात ठाकरे गट आजमावणार ताकद; उद्धव ठाकरेंना मिळणार काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ?

शासन आपल्या दारी मग ही गर्दी कशी?

दानवे यांनी हे संवेदनाहीन, निर्ढावलेले सरकार असल्याची टीका केली. सरकारच्या पैशावर शासन आपल्या दारी उपक्रम सुरू आहे. जर शासन दारी येत असेल तर मग लोकांची कामे होत नाहीत म्हणून ते मंत्रालयात गर्दी करतात, ते कशाचे द्योतक आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार हरिभाऊ बागडे यांना पंचायत समितीमध्ये काम होत नसल्याने ठाण मांडून बसावे लागले. हे सरकार फक्त बोलते. सरकारी पैशाने शो करत असल्याची टीका केली.

समन्यायी पाणी वाटप हवे

मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. समुद्रात वाहून जाणारे कोकणातील पाणी मराठवाड्याकडे वळवण्याची महत्त्वाकांक्षी योजना झाली मात्र पुढे काहीच प्रगती झाली नाही. मुकणे- वैतरणा जोडण्यासाठी निविदा निघाली मात्र पुढे अजूनही सरकार उदासीन आहे. समन्यायी पाणी वाटप झाले तरच मराठवाड्याचा विकास होणार आहे, यासाठी पाण्याचे समन्यायी वाटप झाले पाहिजे असे मत व्यक्त केले.

Ambadas Danve Coffee with Sakal Activities
धक्कादायक! बहिणीला शेवटचा फोन करत तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, पत्नीनंही स्वत: ला संपवण्याचा केला प्रयत्न

पावसाळी अधिवेशनातील चर्चेच्या अनुषंगाने ते म्हणाले, विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. कायदा व सुव्यवस्था, राज्यातून बाहेर जाणारे उद्योग, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, कांद्याचे अनुदान, माथाडी कामगार कायद्यासारखे विषय लावून धरले. आमच्या दबावामुळेच सरकारला माथाडी कामगार कायदा मागे घ्यावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.