Amit Deshmukh : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखांना कोरोनाची लागण

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांकृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे.
amit deshmukh
amit deshmukhesakal
Updated on

लातूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांकृतिक कार्यमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत स्वतः देशमुख यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. माझी आज कोविडची (Covid19) चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. माझ्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. तसेच मी माझ्या डाॅक्टरांच्या संपर्कातही आहे. राज्यात तिसऱ्या लाटेत अनेक मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याचे दिसले आहे. यापूर्वी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, महादेव जानकर आदींना कोरोना झाला होता. (Amit Deshmukh Test Positive For Covid19)

amit deshmukh
धक्कादायक ! नराधम बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

नुकतेच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) हे कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे बुधवारपासून पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.