Shivsena : ''सेनेच्या गळतीमागे एकनाथ शिंदे नाहीत'', संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut
Sanjay RautEsakal
Updated on

मुंबईः ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या दाव्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जी गळती लागली होती, त्याला एकनाथ शिंदे जबाबदार नव्हते, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

बरोबर वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करुन इतिहास घडवला होता. शिवसेनेचे ४० आणि अपक्ष १० असे ५० आमदार फोडून शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी केली. एकनाथ शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री केलं आणि नाईलाजाने देवेंद्र फडणविसांनी उपमुख्यमंत्री व्हावं लागलं.

Sanjay Raut
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना झेड ऐवजी वाय सुरक्षा! संपूर्ण ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा केली कमी

या बंडाविषयी बोलतांना संजय राऊत यांनी एक मोठा खुलासा केला आहे. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमामध्ये बोलतांना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्याकडे केवळ सात ते आठ आमदार होते. बाकीचे फुटलेले सगळे आमदार अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी फोडले आहेत.

संजय राऊत यांच्या दाव्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवसेनेत झालेल्या बंडामुळे सगळे तुम्हाला दोष देतात, या प्रश्नावर राऊत म्हणाले की, ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितला त्या दिवशी मी त्यांच्याविरोधात उभा दावा ठोकाला. एकनाथ शिंदेंपासून १२ ते १३ आमदारांवर ईडीच्या केसेस होत्या. त्यांना धमकी देण्याचं काम भाजपने केलं.

Sanjay Raut
ICC Test Ranking Rishabh Pant : सहा महिन्यापासून संघाबाहेर तरी ऋषभ पंत वाचवतोय भारताची लाज

काय म्हणाले संजय राऊत?

  • एकनाथ शिंदेंकडे फक्त सात ते आठ होते.

  • बाकीचे सगळे आमदार देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी फोडले.

  • ज्या दिवशी त्यांनी शिंदेंनी शिवसेनेवर दावा सांगितला तेव्हा मी त्यांच्याविरोधात उभा दावा ठोकला

  • मुख्यमंत्र्यांपासून त्यांच्यातल्या १२ ते १३ आमदारांवर ईडीच्या केसेस आहेत

  • त्यांना धमकावलं, मलाही धमकावलं. मला अटक करा, मी घाबरत नाही. पण मी पक्ष सोडणार नाही.

  • अशी भूमिका मी घेतली होती, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.