Amit Shah Jalgaon:
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जळगाव दौऱ्यावर आहेत. आज जळगावात सागर पार्कवर भाजप युवासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात अमित शाह युवकांसोबत संवाद साधला.
येणाऱ्या निवणुकीबाबात मी बोलायला आलो आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी निवडणूक आहे. विकसित भारत बनण्यासाठी ही निवडणूक होती. पुढच्यावेळी व्यासपीठावर वेगळे नेते असतील पण युवकांचा विकास झालेला असेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
आगामी निवडणूक २०४७ च्या विकसित भारतासाठी आहे. भाजप आणि मोदींची नाही तर ही तुम्हा युवकांची निवडणूक आहे. ही तरुणांची निवडणूक आहे. मोदींविरोधात तयार झालेली आघाडी कमजोर आहे. घराणेशाही पुढे नेणारा पक्ष देशाचा विकास करु शकत नाही. इंडिया आघाडी फक्त त्यांच्या मुला मुलींना सत्तेत बसवण्यासाठी आहे. उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचे आहे, तर शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचे आहे, असे अमित शाह म्हणाले.
शहा म्हणाले, सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचे आहे. सर्व पक्ष घराणेशाही माणनारे आहेत. मोदींनी ३७० कलम हटवले आणि खऱ्या अर्थाने काश्मिरला भारतासोबत जोडले. सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला धडा शिकवला. आगामी निवडणूक भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी आहे.
अमित शाह यांनी शरद पवार यांना देखील टोला लगावला आहेत. देशाला सुरक्षित आणि समुद्ध करण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदींना पुन्हा संधी दिल्यास अर्थव्यस्था तिसऱ्या क्रमांकावर जाईल. मी शरद पवार यांना विचारतो. पवारसाहेब मोदींना १० वर्ष झाले पण तुम्हाला महाराष्ट्राची जनता ५० वर्ष सहन करत आहे. ५० वर्ष सोडा जनतेला ५ वर्षाचा हिशोब द्या. मी तर १० वर्षाचा हिशोब द्यायला तयार आहे, असा पलटवार अमित शाह यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.