Amit Shah : 'मुस्लिम आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी', अमित शाह नांदेडमधून म्हणाले...

Amit Shah
Amit Shah esakal
Updated on

नांदेडः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नांदेडमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचा इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरेंनी ट्रिपल तलाख, कलम ३७०, राम मंदिर, समान नागरी कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहन अमित शाहांनी केलं. सत्तेसाठी दिलेला शब्द मोडून उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जावून बसले, त्यांनी गद्दारी केली, अशी टीका त्यांनी केली.

काय म्हणाले अमित शाह?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. ते परदेशात गेले तर कुणी ऑटोग्राफ मागतंय, कुणी पाय धरतंय तर कुणी बॉस म्हणतंय.. मोदींचा करिष्मा जगभर पसरल्याचं अमित शाह म्हणाले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख दिग्गज नेता असा केला. मुख्यमंत्री पदाच्या काळात महाराष्ट्राला एक नंबर करण्यासाठी फडणवीसांनी परिश्रम घेतल्याचं अमित शाहांनी सांगितलं.

Amit Shah
Eknath Shinde : कल्याणनंतर सोलापुरात धुसफूस; भाजप काम करु देत नसल्याचा शिंदे गटाचा आरोप

अमित शाहांच्या भाषणातील मुद्दे...

  • या नांदेडच्या भूमीने परदेशी ताकदीला शह देण्याची हिंमत दाखवली

  • महाराष्ट्राने मोठ्या मनाने मोदींजींना मतं दिली. त्यामुळे ते पंतप्रधान होऊ शकले

  • हे ९ वर्षे भारताच्या गौरवाचे, विकासाचे, गरिबांच्या कल्याणाचे आहेत

  • यूपीए सरकारने १२ लाख कोटींचे घोटाळे केले.

  • या ९ वर्षांमध्ये विरोधकसुद्धा आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावू शकत नाहीत

  • मोदीजींनी पाकिस्तानच्या घरात घुसून आतंकवादाला संपवण्याचं काम केलं

  • सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करुन मोदींनी पाकिस्तानला जागा दाखवली आहे

  • देशातल्या गरीबांसाठी खऱ्या अर्थाने मोदीजींनी काम केलं आहे

  • एकीकडे नरेंद्र मोदी देशाची मान अभिमानाने उंचावत आहेत.

  • दुसरीकडे राहुल गांधी देशाबद्दल परदेशात जावून वाईट बोलत आहेत.

  • इथे त्यांचं ऐकायला कुणी नसल्याने राहुल गांधी बाहेर देशात जावून बोलत आहेत

Amit Shah
Income Tax : प्राप्तिकर विभागाच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत तर असे होतील परिणाम

उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा

बहुमत मिळत असेल तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. परंतु सत्तेसाठी ते काँग्रेसच्या मांडीवर जावून बसले. समान नागरी कायदा आणला पाहिजे की नाही? ट्रिपल तलाख, कलम ३७० रद्द करण्याला तुमचं समर्थन आहे की नाही? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून विचारला.

मुस्लिम आरक्षण हे संविधानाला धरुन नाही. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही. मुस्लिम आरक्षण जायला पाहिजे की नाही? हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावं. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार इतिहासाच्या पुस्तकातून वीर सावरकरांचे धडे काढून टाकत आहे. याला तुमचं समर्थन आहे का? दगा देण्याचं, धोका देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे, असा निशाणा अमित शाह यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.