Amit Shah Pune Visit : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज पुण्यात होते. बहुराज्यीय सहकारी संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी सहकारी साखर कारखान्यांना उभारी देण्यासाठी केंद्र सरकार तत्पर असल्याचं सांगून निधीबाबचं आश्वासन दिलं.
पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना अमित शाह म्हणाले की, कॉर्पोरेट सेक्टरसाठी जी व्यवस्था आहे तीच सहकारासाठी तयार करण्यात आलीय. साखर कारखान्यांच्या समस्या वर्षानुवर्षे सुटत नव्हत्या आपण त्या अल्पावधीत सोडवल्या. अजितदादा म्हणाले टॅक्सचे १० हजार कोटी रुपये वाचले. परंतु हर्षवर्धनजींनी सांगितलं की पॅनल्टीसह ३० हजार कोटी माफ झालेले आहेत. मात्र आता सरकार टॅक्स लावणारच नाही, त्यामुळे चिंता नाही.
पुढे बोलतांना शाह म्हणाले की, सहकारामध्ये जे बदल होत आहेत त्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्र्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. आता सहकारातल्या नफ्यावर शेतकऱ्यांचा अधिकार असणार आहे.
महाराष्ट्रात असा एकही सहकारी साखर कारखाना नाही पाहिजे जो इथेनॉल बनणार नाही. एनसीबीकडे खूप पैसा आहे. आत्ताच दहा हजार कोटींची घोषणा केली परंतु ते विसरुन जा, जेवढा पैसा लागेल तेवढा केंद्र सरकार देईल, यात शंका नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.