Mahayuti Seat Sharing Formula: बंद दाराआड अर्धा तास चर्चा अन् अमित शाहांनी सोडवला महायुतीतला तिढा, अजितदादा, शिंदे गटाला किती जागा?

Mahayuti Seat Sharing Formula: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते, यावेळी महायुतीचा जागावाटपाचा तिढा अवघ्या ३० मिनिटात सुटल्याची माहिती समोर आली आहे.
Mahayuti Seat Sharing Formula
Mahayuti Seat Sharing FormulaEsakal
Updated on

लोकसभा निवडणुकीचे वारे देशभरात वाहू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जागावाटप, दौरे, सभा, उमेदवारीच्या चर्चा सध्या सर्वत्र दिसून येत आहे. अशातच महाराष्ट्रात जागावाटपावरून सुरू असलेला तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे. काल(मंगळवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते, यावेळी महायुतीचा जागावाटपाचा तिढा अवघ्या ३० मिनिटात सुटल्याची माहिती समोर आली आहे.

राज्याच लोकसभेचे एकूण ४८ मतदारसंघ आहेत. २०१९ च्या निवडणुकीमध्ये यापैकी ४१ जागा युतीने जिंकल्या होत्या. यामध्ये भाजपला २३ तर शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळवला होता. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस ४ आणि काँग्रेस तसेच अपक्षाला प्रत्येकी १ जागा मिळाली होती.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचे लक्ष समोर ठेवले आहे. राज्यात सध्या भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे महायुती सरकार आहे. तिन्ही पक्ष एकत्र आल्याने लोकसभेच्या जागावाटपावरून तिढा निर्माण झाला होता. हा तिढा आता सुटल्याची माहिती समोर आली आहे.

Mahayuti Seat Sharing Formula
वाहने शिस्तीत चालवा..! सोलापूर शहर-ग्रामीणचे वाहतूक पोलिस ॲक्शन मोडवर; एका वर्षातच ३ लाख बेशिस्त वाहनचालकांना २२ कोटींचा दंड

जळगाव आणि संभाजीनगरमध्ये सभा घेतल्यानंतर ) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी रात्री मुंबईत आले. मुंबईत दाखल झाल्यानंतर अमित शाह सह्याद्री अतिथीगृहावर गेले. तिथे अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. यावेळी, अमित शहा (Amit Shah) यांनी जागा वाटपाचा तिढा फक्त ३० मिनिटातच सोडवला असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर बैठकीत व्यवहार्य तोडगा काढा, हट्ट नको, असा सल्ला अमित शहा यांनी भाजपसह महायुतीमधील इतर पक्षांना दिल्याची माहिती आहे.

Mahayuti Seat Sharing Formula
Uddhav Thackeray : गद्दारांना धडा शिकवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन; सत्तेसाठी बदलला पक्ष

त्याचबरोबर भाजप लोकसभेत ३० जागांवर निवडणूक लढवणार असून शिंदे गटाला १२ जागा, तर अजित पवार गटाला ६ जागा मिळतील, असं अमित शहा यांनी महायुतीतील नेत्यांना सांगितलं असल्याची माहिती साम टिव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. ४०० चे टार्गेट घेऊन कामाला लागा, असा सल्लाही अमित शहा यांनी दिल्याची माहिती आहे.

Mahayuti Seat Sharing Formula
पोलिस भरतीसाठी अर्ज करतायं का? सर्व उमेदवारांची एकाचवेळी होणार परीक्षा; ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत; अर्ज कुठे व कसा करायचा, जाणून घ्या...

त्याचबरोबर, 400 प्लसचे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात महायुती म्हणून कामाला लागा. जागा वाटपावर जास्त चर्चा करत न बसता आपले मिशन मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे हे डोळ्यासमोर ठेवा. जागा वाटपात महायुतीत कुणावरही अन्याय होणार नाही. उमेदवार कुणीही असला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही तिन्ही पक्षाची असेल. काही जागाबाबत वाद असतील तर एकत्र बसून सोडवा, अशा सूचना अमित शाह यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.