Amit Shah: नकली शिवसेना म्हणत अमित शाह यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचले

Shiv Sena UBT: यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील पक्षाला नकली शिवसेना म्हणत डिवचले आहे.
Amit Shah
Amit ShaheSakal
Updated on

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नांदेडचे भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले आहेत.

यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील पक्षाला नकली शिवसेना म्हणत डिवचले आहे. यापूर्वी रामटेक येथे झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नकली शिवसेना म्हटले होते.

शाह म्हणाले, महाराष्ट्रात आपल्यासमोर एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि आर्धी राहिलेली काँग्रेस निवडणूक लढवत आहेत.

यावेळी अमित शाह यांनी माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, माजी पंतप्रधान मनमोह सिंह आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर सडकून टीका केली.

शाह म्हणाले की, शरद पवार इतकी वर्षे सत्तेत होते पण त्यांना महाराष्ट्राचा कोणत्याही प्रकारचा विकास करता आला नाही. महाराष्ट्राचा जर विकास कोणी केला असेत तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

Amit Shah
Sharad Pawar: मंडलिकांच्या शाहू महाराजांवरील 'दत्तक' टीकेनंतर शरद पवार म्हणाले, ही गोष्ट काही...

यावेळी अमित शाह यांनी अर्थव्यवस्थेपासून राम मंदिरापर्यंत अशा चौफेर विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आपली अर्थव्यवस्थ जगात 11व्या क्रमांकावर सोडून गेले होते. पण गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती 5व्या क्रमांकावर आणली. आता जर तुम्ही मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान केले तर ते आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणतील.

महाराष्ट्रातील विरोधी पक्ष म्हणजे ऑटो रिक्षा आहेत. ही रिक्षा कोणताही विकास करू शकणार नाही. दुसरीकडे मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली देशभक्तांची टोळी आहे. त्यामुळे यंदा एनडीए 400 पेक्षा जास्त जागा मिळवणार यात शंका नाही.

Amit Shah
Lok Sabha Election 2024: एक मत देखील महत्वाचं! शंभर वर्षीय मतदारासाठी निवडणूक पथक पोहचलं तीन राज्यांच्या सीमेवर

आपल्या भाषणाच्या शेवटी अमित शाह यांनी औरंगाबादच्या नामांतराचा विषय मांडला. ते म्हणाले, "औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण करण्याचे स्वप्न भाजपने पूर्ण केले. एकीकडे बाळासाहेबांना औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे असे वाटयचे तर दुसरीकडे शरद पवार या सातत्याने विरोध करायचे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.