मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे राज्यातील पोलिसांसाठी पुढे आले आहेत दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला, यानिमीत्त राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना एक पगार एवढा बोनस द्या अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासूनचा चुकीचा सरकारी पायंडा मोडून पुन्हा एकदा पोलिसांना ए राज्यातील पोलिसांना एक पगार दिवाळी बोनस देण्यास सुरुवात करावी आणि पोलीस बांधवांची यंदाची दिवाळी गोड करावी अशा आशयाचे पत्र लिहीत अमित ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. चुकीचा सरकारी पायंडा मोडून पोलिसांची दिवाळी गोड करावी यासाठी पोलिसांना बोनस द्या, असे अमित ठाकरे म्हणाले आहेत.
अमित ठाकरे यांनी लिहीलेलं पत्र आहे तसं..
महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्यात आपले पोलीस बांधव दिवस-रात्र एक करतात. तुमच्या माझ्यासह राज्यातील सर्व नागरिक सणासुदीच्या दिवसांत सुट्टी घेऊन कुटुंबीय तसंच मित्रमंडळीसह जे काही आनंदाचे क्षण अनुभवतात, ते याच पोलिसांच्या अविरत सुरक्षा सेवेमुळे. अतिमहत्वाची शासकीय सेवा नोकरी म्हणून पोलीस बांधव ना युनियन करू शकतात, ना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना पाच दिवसांचा आठवडा असतो, ना त्यांना पुरेशा सुट्टया मिळतात. कामाचे तास तर सर्वात जास्त १२ ते १५ तास! पोलीस बांधवांच्याच म्हणण्यानुसार, इतर शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा त्यांना एका वर्षात तब्बल ७६ दिवस अतिरिक्त काम करावे लागते!
हे सगळं आज सांगण्याचं कारण इतकंच की, पुढच्या आठवड्यात दिवाळी साजरी करताना आपल्या प्रत्येकाच्या घरात जेव्हा कंदील आणि पणत्या लागतील, तेव्हा पोलीस बांधव डोळ्यात तेल घालून गस्त देत असतील.... फटाके वाजवताना कुठे कुणी लहान मुलगा भाजला तर त्याला रुग्णालयात दाखल करत असतील... पोलीस बांधव आपल्यापैकीच आहेत, त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळी साजरी करावीशी वाटत असेल, हे एक समाज म्हणून आपण विसरूनच गेलोय.
माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की, गेल्या अनेक वर्षांपासूनचा चुकीचा सरकारी पायंडा मोडून पुन्हा एकदा पोलिसांना एक पगार दिवाळी बोनस देण्यास सुरुवात करावी. पोलीस बांधवांची यंदाची दिवाळी गोड करावी.
धन्यवाद.
आपला नम्र,
अमित ठाकरे
राज ठाकरेंची शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना साद घातली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अवगत करुन दिल्या. आज दिलेल्या पत्रामध्ये राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलीय. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं अपरिमित नुकसान झाल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी ठाकरेंनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.