Amol Kolhe on No-Confidence Motion:कॉंग्रसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावाचं समर्थन करताना लोकसभेचे खासदार अमोल कोल्हेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि केंद्र सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी भारताच्या दरडोई उत्पन्नात भारताची झालेली दुरावस्था आणि शेतकऱ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारची तुलना गांधीजींच्या माकडांशी केली. खासदार कोल्हेंनी सरकारला लोकमान्य टिळकांच्या ऐतिहासिक वाक्याचीही आठवणी करुन दिली.
अविश्वास प्रस्तावाचं समर्थन करताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, "मी सरकारच्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या समर्थनार्थ उभा आहे. सरकारच्या कार्यपद्धतीला बघून गांधीजींच्या तीन माकडांची आठवण येते. सरकारविरोधात काहीही ऐकू नका,
निवडणूक सोडून देशाची अवस्था बघू नका, विरोधी पक्षांच्या नेत्यांना शांत करुन त्यांची बोलती बंद करा. कसा विश्वास करणार या सरकारचा जे महागाईवर बोलत नाही, जे आर्थिक विकासाचे आकडे फेकतात, मात्र व्यक्तीच्या दरडोई उत्पन्नावर बोलत नाही."
त्यानंतर अमोल कोल्हेंनी सभागृहाचं लक्ष्य दर डोई उत्पन्नावर आणण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, "गृहमंत्र्यांनी काल खुप छान गोष्ट केली. ते म्हणाले की आकडे कधी खोटं बोलत नाही. जेव्हा देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोहोचते, तेव्हा दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देश १४१व्या स्थानावर घसरलाय. देशाची संपत्ती काही धनदांडग्यांच्या हातात राहीलीये का?"
यावेळी कोल्हे शेतकऱ्यांबद्दल बोलताना म्हणाले की, "कीटकनाशके आणि खतांच्या किमतीमध्ये ४ते५ टक्क्यांनी वाढ झाली याचा उल्लेख नाही केला. टोमॅटोच्या वाढत्या किमतीमध्ये हस्तक्षेप करण्याच्या वार्ता केल्या, मात्र, जेव्हा शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकतं होते, तेव्हा त्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी सरकार नाही गेलं. "
भाषणाचा शेवट करताना अमोल कोल्हेंनी नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आणि सोबतचं कानही टोचले. ते म्हणाले की, "या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? या वाक्याचं मोदींनी चिंतन केलं पाहिजे."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.