Amol Kolhe Exclusive: अजित पवार-वळसे पाटील विरोधात, अमोल कोल्हेंना दुसरी निवडणूक किती अवघड? स्वत:च केलं स्पष्ट

Amol Kolhe Exclusive: राष्ट्रवादीच्या बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले. या राजकीय गदारोळात डॉक्टर अमोल कोल्हे यांचे नाव सातत्याने चर्चेत होते.
Amol Kolhe Exclusive
Amol Kolhe Exclusive esakal
Updated on

Amol Kolhe Exclusive: राष्ट्रवादीच्या बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले. या राजकीय गदारोळात डॉक्टर अमोल कोल्हे यांचे नाव सातत्याने चर्चेत होते. डॉक्टर अमोल कोल्हे नेमके कोणत्या गटात आहेत याबद्दल साशंकता होती. अमोल कोल्हे यांनी नुकतीच सकाळ ऑफिसला भेट दिली आणि राष्ट्रवादीच्या बंडापासून ते शिरूरच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीपर्यंत ज्या घटना घडल्या त्या सगळ्या घटनांवर अत्यंत मोकळेपणाने भाष्य केले.

आपण शरद पवार गटात असल्याचे ठामपणे सांगत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी आपल्याला तिकीट दिल्याचे सुतवाच अमोल कोल्हे यांनी या भेटीदरम्यान केले.

शिरूर मतदार संघात कोविड काळात केलेली काम, राष्ट्रीय महामार्गाची काम, संसदेत केलेली भाषण, कांदा प्रश्नावर मांडलेल्या आक्रमक भूमिका, बैलगाडा शर्यत कशी सुरु झाली ? हे सगळे विषय अमोल कोल्हे यांनी उलगडून सांगितले.

Amol Kolhe Exclusive
BJP Lok Sabha Candidates List 2024: अमित शाहांची चाणक्यनिती! पहिल्या यादीत खेळले सेफ 8 नवे डाव, भाजपला कसा होणार फायदा?

अजित पवार दिलीप वसे पाटील यासारखे दिग्गज राष्ट्रवादीचे नेते हे यंदाच्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांच्या विरोधात काम करत आहेत. अशावेळी ही निवडणूक आव्हानात्मक असली तरी शरद पवार सोबत असल्यामुळे निवडणुकीत नक्की यश संपादन करू असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

Amol Kolhe Exclusive
Lok Sabha Election 2024 : ठरलं! लोकसभेसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी आली, मोदी 'या' मतदारसंघातून लढवणार खासदारकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.