Amol Kolhe: राजीनाम्यासाठी शरद पवारांची भेट घेतली! पण आता अमोल कोल्हेंची म्हणतात...

राजीनाम्याबाबत मत जाणून घेण्यासाठी त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली.
Sharad Pawar_Amol Kolhe
Sharad Pawar_Amol Kolhe
Updated on

मुंबई : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादांसोबत शपथविधी सोहळ्यात दिसलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे पुन्हा शरद पवारांकडे परतले आहेत. पण त्यांनी खासदारकीची राजीनामा देण्याचा मानस बोलून दाखवला होता. याबाबत पवारांचं मत जाणून घेण्यासाठी त्यांनी आज पवारांची भेटही घेतली. या भेटीनंतर त्यांना पवारांनी महत्वाचा सल्लाही दिला. (Amol Kolhe met Sharad Pawar for resignation now he will not resign anymore)

Sharad Pawar_Amol Kolhe
Raj Thackeray: "कॅरम इतका चुकीचा फुटलाय की, कुठल्या सोंगट्या..."; राज्याच्या स्थितीवर राज ठाकरेंचं भाष्य

पवारांच्या भेटीत त्यांनी काय सल्ला दिला हे सांगताना कोल्हे म्हणाले, "साहेबांचं म्हणणं होतं की हे सर्व चुकीचं आहे ही माझी जी भावना आहे तीच भावना अनेकांची आहे. अनेक मतदारांची, तरुणाईची भावना देखील हीच आहे. अशा परिस्थितीत आपल्याला या तरुणांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar_Amol Kolhe
Shambhuraj Desai: अजितदादांच्या एन्ट्रीमुळं खेळ बिघडणार? शंभुराज देसाईंचं ठाकरेंबाबत मोठं विधान

त्याचबरोबर शिरुर लोकसभा मतदारसंघातील लोकांनी तुझ्यावर पाच वर्षांसाठी हा विश्वास ठेवला आहे. आणखी आठ-दहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. अनेक कामं मार्गी लागली आहेत आणि काही कामं मार्गी लागण्याच्या दृष्टीक्षेपात आहेत. यासाठी ज्या गोष्टींसाठी तुला विश्वास ठेवून निवडून दिलं ती जबाबदारी पूर्ण करावीत असं मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Sharad Pawar_Amol Kolhe
Sushma Andhare: राज, उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं का? सुषमा अंधारेंनी स्पष्टच सांगितलं

अमोल कोल्हे अजित पवारांची साथ सोडून परत शरद पवारांकडं का आले? हे सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत महाराजांनी कधीही स्वराज्य गहाण ठेवलं नाही. त्यांच्या भूमिका मी जगत आलो आहे, त्यामुळं हे चुकीचं असल्याची आपली भावना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.