मोदी पंतप्रधानपदी बसू शकतात, मग शरद पवार का नाही? - अमोल कोल्हे

महाराष्ट्राच्या या नेतृत्वाने देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली आहे.
मोदी पंतप्रधानपदी बसू शकतात, मग शरद पवार का नाही? - अमोल कोल्हे
Updated on
Summary

महाराष्ट्राच्या या नेतृत्वाने देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली आहे.

मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांचा आज ८१ वा वाढदिवस (Sharad Pawar 81 Birthday) आहे. त्यानिमित्त मुंबईतील नेहरू केंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांनी पवारांना शुभेच्छा देत वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केली आहेत. महाराष्ट्राच्या (Maharashtra) नेतृत्वाने देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यात एक मोठा वाटा शरद पवार यांचा असल्याचं गौरोवउद्गार खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी काढले आहे.

ते म्हणतात, पवार हे शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार आहेत. महिलांना लष्करात भरती, राजकारणात आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्याची अमंलबजावणी केली. याच महिलांना आज प्रगतीची शिखरे गाठली आहेत. त्यामुळे शरद पवार हे फुलेंचे वैचारिक वारसदार आहेत. त्यांचं मार्गदर्शन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. पवार हे गेली चाळीस वर्ष दिल्लीतील राजकारणाची ओळख बनून राहिले आहेत. आमच्या नेत्याला पाच लाखाचा सूट घालावा लागत नाही. हजारो रुपयांचे तैवानी मशरुम खावे लागत नाही. असा चिमटा त्यांनी काढला आहे. बिहार, पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर त्यांचे नेते शरद पवार साहेबांना भेटायला येतात, त्यामुळे नेहमीच 'हर अर्जुन का सारथी' हे त्यांना लागू होते.

मोदी पंतप्रधानपदी बसू शकतात, मग शरद पवार का नाही? - अमोल कोल्हे
'देशातील कुठल्याही नेत्याला पवारांचं मार्गदर्शन घ्यावं लागतंय'

पुढे शरद पवार यांच्याबद्दलचा आठणीतला एक किस्सा त्यांनी सांगितला. ते म्हणाले, भुज भूकंपावेळी शरद पवार यांची अटल बिहारी वाजपेयी यांनी वाहवा केली होती. आता मात्र संप्रदायिकांचे हादरे या देशाला बसत आहेत. त्या टोकदार भाल्याने देश रक्त बंबाळ होत आहे. टोकाची भूमिका निर्माण होत आहे त्यामुळे तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. जर २६ खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातील व्यक्ती का पंतप्रधानपदावर बसू शकत नाही. याचा विचार करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

मोदी पंतप्रधानपदी बसू शकतात, मग शरद पवार का नाही? - अमोल कोल्हे
राहुल गांधींच्या मुंबईतील सभेला परवानगी मिळणार का? गृहमंत्र्यांचं सूचक विधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.