''नवा जावई शोध लावणाऱ्या...'' मिटकरींचा थेट शाहरुखला सल्ला

amol mitkari suggestion shah rukh khan lata mangeshkar funeral video controversy
amol mitkari suggestion shah rukh khan lata mangeshkar funeral video controversye sakal
Updated on

नागपूर : भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar Passes Away) यांचं अंत्यदर्शन घेताना शाहरुख खाननं दुआ मागितली. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. शाहरुख थुंकल्याचा (Shah Rukh Khan) दावा करणाऱ्या काही पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे. त्यावरूनच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी शाहरुखला ट्विटरवरून सल्ला दिलाय.

amol mitkari suggestion shah rukh khan lata mangeshkar funeral video controversy
शाहरुख,सलमान,हृतिक स्पाय थ्रीलरसाठी एकत्र?

"दुआ पठण" करणे म्हणजे थुंकणे, असा नवा जावई शोध लावणाऱ्या लावारीस कारट्यांना शाहरुख खान ने "नया है वह" म्हणून दुर्लक्षित करावे, असा सल्ला आमदार अमोल मिटकरी यांनी शाहरुख खानला दिला आहे. तसेच माझ्या या ट्विटवरून मला काही जण ट्रोल करतील याची जाणीव ठेवून मी बोलत आहे, असंही मिटकरी म्हणाले.

नेमकं प्रकरण काय? -

भारतरत्न लता मंगेशकर यांचं रविवारी निधन झालं. त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक दिग्गजांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थिती दर्शवली. अभिनेता शाहरुख खान याने लता दीदींना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शाहरुख दुआ पठण करताना थुंकला असा दावा काही जणांनी केला आहे. पण, शाहरुख दुआ पठण केल्यानंतर फुंकर घातली, असं सांगत अनेकांनी थुंकल्याचा दावा खोडून काढला. त्यानंतर आता सोशल मीडियावर वाद सुरू आहे.

शाहरुख खरंच थुंकला का? -

शाहरुख थुंकला नसून दुआ केल्यानंतर त्यानं फुंकर घातली. इस्लाम धर्मात दुआ करताना अशा पद्धतीनं फुंकर घातली जाते, असं या धर्मातील तज्ज्ञ सांगतात. इस्लामची माहिती असणाऱ्या अनेकांनी शाहरुख थुंकल्याचा हा दावा खोडून काढत शाहरुखने मास्क खाली घेऊन पार्थिवाकडे पाहून फुंकर मारल्याचं म्हटलं. एखाद्या व्यक्तीला अखेरचा निरोप देताना त्याच्या पार्थिवावर फुंकर मारल्यास पार्थिवासोबतच्या नकारात्मक शक्ती दूर लोटल्या जातात असा समज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.