अमरावती : राणांच्या घरात शिरण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न, पोलिसांसोबत झटापट

राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचं म्हणणार असल्याचं जाहीर केल्यानंतर हा वाद उफाळला.
ShivSainik_Amravati News
ShivSainik_Amravati News
Updated on

अमरावती : मुंबईनंतर आता अमरावतीमधील आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर शिवसैनिकांचा जोरदार राडा घातला. त्यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापटही झाली. यावेळी काही शिवसैनिकांनी बॅरिकेट्सवर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न, यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Amravati Shiv Sainik try to break into Ravi Rana house clash with police)

ShivSainik_Amravati News
कायदा-सुव्यवस्था राहिली नसल्याचं दाखवण्यासाठी विरोधकांची धडपड - गृहमंत्री

राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याचं जाहीर केलं होतं. शिवसेना पक्ष प्रमुखांच्या घरावर जाणार असाल तर आम्ही तुमच्या घरापर्यंत येऊ अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. यामुळं आज दिवसभर दोन्ही बाजूंनी आंदोलनांचं सत्र पहायला मिळालं.

ShivSainik_Amravati News
'तुम्हालाही तुरुंगात टाकू', राणांनी शिवसेना खासदारावर केले होते गंभीर आरोप

दरम्यान, राणांच्या घरात घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसैनिकांनी पोलिसांनी रोखलं असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, राणा पती-पत्नी या दोघांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी सकाळी ९ वाजता आपलं घर सोडलं. यावेळी पोलिसांनी या दोघांनाही विनंती केली होती की त्यांनी घरातचं रहावं. कारण जर ते घराबाहेर पडले तर कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते.

दरम्यान, शिवसैनिकांनी राणा यांच्या घराबाहेर एक रुग्णवाहिका आणून ठेवली होती या रुग्णवाहिकेवर 'बंटी आणि बबलीसाठी राखीव' असं पोस्टर चिकटवण्यात आलं होतं. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला इशारा देताना म्हटलं की, त्यांनी जर मातोश्रीकडं जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना प्रसाद देण्यात येईल तसेच त्यांना रुग्णवाहिकेत पाठवण्यात येईल. त्यासाठी शुक्रवारी सकाळी अनेक शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर ठिय्या मांडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.