Amruta Fadanvis: भाजपची साथ सोडली...; अमृता फडणीसांचे ट्विट चर्चेत

amruta fadnavis on shivsena election symbol bow and arrow frozen maharashtra Politics
amruta fadnavis on shivsena election symbol bow and arrow frozen maharashtra Politics
Updated on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर एकापाठोपाठ शिवसेनेला अनेक धक्के बसले आहेत. आता निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं पक्षाचं शिवसेना हे नाव वापरण्यासही निवडणूक आयोगानं मनाई केली आहे. यावरून शिवसेना आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान या सर्व राजकीय लढाईदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत करत शिवसेनेला आतापर्यंत बसलेला सर्वात मोठा धक्का कोणता, असा प्रश्न जनतेला विचारला आहे, त्यांनी खाली काही पर्याय देखील दिले आहेत.

अमृता फडणवीस या राजकीय घडमोडींवर सतत व्यक्त होत असतात, यावेळी देखील शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यावर त्यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी त्यांच्या फॉलोअर्सना शिवसेनेला आतापर्यंत बसलेला सर्वात मोठा धक्का कोणता असे विचारले आहे, यासाठी त्यांनी चार पर्याय देखील दिले आहेत. अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे की, पूर्वीच्या शिवसेना-उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का कोणता आहे.

  1. धनुष्य आणि बाण चिन्ह गमावणे.

  2. 40 आमदार आणि 12 खासदार गमावणे.

  3. दीर्घकाळ एकनिष्ठ राहीलेला सहकारी भागीदार भाजपची साथ गमावणे.

  4. कट्टर उजव्या विचारसरणीचा हिंदू पक्ष असल्याची ओळख गमावणे.

amruta fadnavis on shivsena election symbol bow and arrow frozen maharashtra Politics
Shivsena: त्यांना धनुष्यबाणाबद्दल प्रेम नव्हतंच, त्यांना फक्त...; चिन्ह गोठवल्यानंतर केसरकरांचा हल्लाबोल

दरम्यान निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्याचा निर्णय अंतिम नाहीये, आगामी अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढे या प्रकरणी सुनावणी होईल आणि नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच या निर्णयाविरोधात शिंदे आणि ठाकरे गटांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे.

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरीतली एक जागा रिक्त आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीमध्ये जर ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांना उमेदवार उभे करायचे असतील, तर ते निवडणूक आयोगाच्या या निकालाला आव्हान देऊ शकतात. शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबद्दल सहा महिन्यात आयोगाने निकाल देणं अपेक्षित आहे. आत्ता दोन्ही गटांनी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केलंय. तोंडी पुरावे काय दिले जातायत, हेही लक्षात घेतलं जाईल. त्यानंतर निवडणूक आयोग निकाल देईल आणि पक्षाचं भवितव्य ठरेल.

amruta fadnavis on shivsena election symbol bow and arrow frozen maharashtra Politics
Uddhav Thackeray: निवडणूक आयोगाकडून चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले...

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत जिंकून दाखवणारच असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. इन्स्टाग्रामवर केलेल्या या पोस्टला शिवसैनिकांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय. पुढील संघर्षासाठी आम्ही तयार असल्याचेही शिवसैनिकांनी या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.