Anand Dighe : ...अन् जिवावर खेळून ठाण्यात साखर आणणारा रिक्षावाला आनंद दिघे यांचा पट्टशिष्य बनला

एकनाथ शिंदेंनी कसा जिंकला होता आनंद दिघे यांचा विश्वास?
Anand Dighe Jayanti
Anand Dighe Jayantisakal
Updated on

Anand Dighe Jayanti : आज आनंद दिघे यांची जयंती. ठाणे शहरातील टेंभी नाका भागात २७ जानेवारी १९५२ आनंद दिघे यांचा जन्म झाला. पुढे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रभावित त्यांनी वयाच्या १८व्या वर्षी शिवसेनेत प्रवेश केला होता. ठाण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारा नेता म्हणून आनंद दिघेंची ओळख आहे.

उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे आनंद दिघे गुरू आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आनंद दिघेंविषयी बोललं जातं तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदे यांचं नाव समोर येतं. आज आपण त्यांच्या खास नात्याविषयीच जाणून घेणार आहोत.

एकनाथ शिंदेंनी कसा जिंकला आनंद दिघे यांचा विश्वास?

एक काळ असा होता की ठाण्यात प्रचंड साखरेचा तुडवडा होता. अशावेळी ठाण्याला साखर पुरवणे, अत्यंत गरजेचं होतं. यावेळी ठाण्यात साखर आणायची जबाबदारी दिघेंनी एकनाथ शिंदेंना दिली होती. प्रचंड धोकादायक परिस्थितीत ट्रक घेऊन कारखान्यातून साखर आणणे, अत्यंत जोखमीचं काम होतं.

चालकाच्या वर असलेल्या लाकडी डब्यात साखर खरेदीसाठी आणलेले पैसे ठेवले होते. कारखान्यात पोहचेपर्यंत एकनाथ शिंदे वारंवार डब्यातील पैसे चेक करायचे. अखेर त्यांनी ठाण्यात साखर आणली आणि लोकांमध्ये वाटली. त्यादिवशी शिंदेंनी आनंद दिघे यांचं मन जिंकलं होतं आणि येथूनच एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली आणि आनंद दिघेंसोबत खास नातं निर्माण झालं.

Anand Dighe Jayanti
Eknath Shinde: CM शिंदेंनी नवस केलेल्या कामाख्या देवीच्या रथानं वेधलं सर्वांचं लक्ष

एकनाथ शिंंदे

शिवसेनेत येण्यापूर्वी आणि आनंद दिघेंना भेटण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांचा जीवनप्रवास खूप रोमांचक होता. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे त्यांचं गाव. पुढे ते शिक्षणासाठी ठाण्यात आले. एक वेळ अशी आली त्यांना हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं.

एकनाथ शिंदेंनी मासळी विकणाऱ्या एका कंपनीतसुद्धा काम केलं पण त्यांना हवे तसे पैसे मिळत नव्हते पुढे त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. याचवेळी ते ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले आणि वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून राजकीय प्रवास सुरू केला. शिवसेनेत असताना ते नेहमी आनंद दिघेंच्या सहवासात होते. आनंद दिघेंचा मोठा प्रभाव त्यांच्यावर झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.