अनंत अंबानींकडून Lalbaug Cha Raja साठी 20 किलोचा सोन्याचा मुकुट अर्पण, किंमत ऐकून व्हाल थक्क

Lalbaugcha Raja Crown: मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याने लालबागच्या राजाला 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. त्याची किंमत 16 कोटी रुपये आहे. अनंत अंबानी यांनी गणेश मंडळांना श्रद्धेने मुकुट सुपूर्द केला आहे.
Lalbaug cha Raja Gold Crown
Lalbaug cha Raja Gold CrownESakal
Updated on

Lalbaug cha Raja Gold Crown: गणेशोत्सव उद्यापासून म्हणजेच शनिवारपासून सुरू होत आहे. मुंबईच्या लालबागच्या राजाची पहिली झलक भाविकांच्या समोर आली आहे. यामध्ये गणेशाच्या मूर्तीला 20 किलो सोन्याचा मुकुट घातला आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनने हा मुकुट भेट दिला आहे. त्याची किंमत 16 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. अनंत अंबानी यांची लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने मंडळाच्या कार्यकारिणीचे प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अंबानींचे कुटुंब दरवर्षी गणपती बाप्पासाठी भक्तीभावाने देणगी देते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.