दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास उजेडात; कऱ्हाडात आढळलं सातवाहनकालीन जातं

Ancient History Objects
Ancient History Objectsesakal
Updated on
Summary

अशी जाती काही दिवसांपूर्वी जुन्नर आणि उस्मानाबाद परिसरातही आढळली आहेत.

कऱ्हाड (सातारा) : कृष्णा नदीच्या (Krishna River) काठावर असणाऱ्या येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या (Dr. Bapuji Salunkhe College) आवारात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे सातवाहनकालीन जातं आढळून आल्याचा दावा साताऱ्याच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. गौतम काटकर (Prof. Gautam Katkar) आणि मानसिंगराव कुमठेकर (Mansingrao Kumthekar) यांनी केला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या माध्यमातून शहराच्या अभ्यासादरम्यान हे जातं मिळाले आहे. हे जातं वैशिष्ट्यपूर्ण असून, त्यावरून दक्षिण महाराष्ट्राच्या सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहास उजेडात आला आहे.

दक्षिण महाराष्ट्राला मोठा प्राचीन इतिहास आहे. या इतिहासाच्या पाऊलखुणा या सातारा जिल्ह्यातील विविध गावांत आढळून येतात. कोल्हापूर, मिरज आणि कऱ्हाड ही या भागातील प्रमुख शहर आहेत. या तिन्ही शहराजवळ बौद्ध लेणी (Buddhist Caves) आढळून आली आहेत. तत्कालीन प्राचीन व्यापारी मार्गावरील ही गावे होत. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने गेली काही वर्षे या भागातील ऐतिहासिक अवशेष, कोरीव लेख यांचा शोध घेतला जात आहे. या अभ्यासादरम्यान नुकतेच मंडळाचे अभ्यासक कुमठेकर आणि प्रा. काटकर यांना येथील कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या आवारात सातवाहनकालीन जातं आढळून आलं आहे. प्राचार्य डॉ. सतीश घाटगे आणि इतिहास विभागाचे प्रा. सचिन बोलाईकर यांच्या सहकार्याने या जात्याचा अभ्यास करण्यात आला. साळुंखे महाविद्यालयाच्या आवारात मिळालेले अवशेष एकत्र ठेवण्यात आले आहेत. मात्र, त्यांचा अभ्यास झाला नव्हता. या अवशेषांमध्येच सातवाहन कालीन जातं आढळून आले आहे. हे जाते सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे असावे. सुमारे तीन फूट परिघाच्या या जात्याला असलेल्या छिद्रातून लाकडी दांडकं घालून ते फिरवलं जात असे. अशी जाती काही दिवसांपूर्वी जुन्नर (Junnar) आणि उस्मानाबाद (Osmanabad) परिसरातही आढळली आहेत.

Ancient History Objects
Political News : निवडणुकीनंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय

कऱ्हाड शहराला प्राचीन इतिहास आहे. आगाशिव आणि जखीणवाडी येथील बौद्ध लेणी पहिल्या- दुसऱ्या शतकातील आहेत. त्यामध्ये ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहेत. त्यावरून कऱ्हाड शहर हे प्राचीन व्यापारी मार्गावर असलेले समृद्ध शहर असल्याचे स्पष्ट होते. करहाटक, कलहराबाद, कराराबाद अशा विविध नावांनी हे गाव इतिहासात ओळखले गेले. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, कलचुरी, शिलाहर, यादव अशा राजवटींबरोबरच बहामनी, आदिलशाही, मुघल आणि मराठ्यांनी इथं राज्य केलं. त्यांच्या खुणा या शहरात पाहायला मिळतात. चालुक्य राजा विक्रमादित्य याचा विवाह कऱ्हाड येथे शिलाहर राजा मारसिंह याची कन्या चंद्रलेखा हिच्याशी झाला होता. सन १९४८-४९ मध्ये या ठिकाणी झालेल्या उत्खननात प्राचीन अवशेष मिळाले होते. प्राचीन इतिहास लाभलेल्या या शहरातील कृष्णा नदीच्या काठावर सातवाहनकालीन जातं मिळालं आहे. त्यामुळे या ठिकाणी सातवाहनकालीन वस्ती असल्याचे सिद्ध होते. साळुंखे महाविद्यालयाच्या आवारात वीरगळ, जुन्या मंदिरांचे अवशेष, जुने पाटा- वरवंटा, असे अन्य अवशेषही आहेत. त्यांचा अभ्यासही मिरज इतिहास मंडळाचे अभ्यासक करीत आहेत. त्यावरून कऱ्हाड शहराच्या प्राचीन इतिहासाच्या पाऊलखुणा उलगडणार आहे, असे प्रा. काटकर यांनी सांगितले.

Ancient History Objects
'झालं तेवढं बास झालं! आता आघाडी धर्माबाबत आम्ही ठरवू'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.