Swatantra Veer Savarkar : अन् काळ्या पाण्यानंतर सुरू झाली सावरकरांची खरी शिक्षा...

काळ्या पाण्याची शिक्षा सोपी नव्हती त्यात त्यांनी काय काय भोगले असेल या...
Swatantra Veer Savarkar
Swatantra Veer Savarkaresakal
Updated on

Swatantra Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी कायम अग्रणी राहिलेले असे जहालमतवादी क्रांतीकारक. 'ने मजसी ने परत मातृभूमीला। सागरा, प्राण तळमळला' सावरकरांच्या या काव्यपंक्तीतून त्यांचं देशाप्रति असलेलं प्रेम प्रतित होतं. दूरदृष्टी, विज्ञानवादी क्रांतीकारक ही सावरकरांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू.

२३ डिसेंबर १९१० रोजी सावरकरांना २५ वर्षांची पहिली आणि ३० जानेवरी १९११ रोजी त्यांना २५ वर्षाची दुसरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. पण, पुढे त्यांची अंदमानच्या काळकोठडीच्या कारागृहातून ६ जानेवारी १९२४ रोजी सुटका झाली. यावेळी सावरकारांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आलं.

Swatantra Veer Savarkar
Andaman Cellular Jail : सावरकरांच्या कारावासामुळे फेमस झालेलं सेल्युलर जेल नक्की कोणी बांधल? जाणून घ्या इतिहास

असं असलं तरी त्यावेळी त्यांना दोन अटी मात्र इंग्रज सरकारनं घातल्या होत्या. पहिली म्हणजे, राजकारणात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घ्यायचा नाही. तर, दुसरी अट ही सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय रत्नागिरी जिल्हा सोडून जायचे नाही. त्यानंतर ६ जानेवारी १९२४ ते १७ जून १९३७ अशी तेरा वर्षे सावरकारांनी रत्नागिरीमध्ये काढली.

Swatantra Veer Savarkar
Veer Savarkar Tourism Circuit : राज्यात साकारणार देशातील पहिले वीर सावरकर पर्यटन सर्किट!

काळ्या पाण्याची शिक्षा सोपी नव्हती त्यात त्यांनी काय काय भोगले असेल याची आपण कल्पनाही नाही करु शकत, रत्नागिरीतही त्यांचे हाल कमी नव्हते, त्यांना आपल्या पितास्थानी असलेल्या मोठ्या भावांना बाबाराव सावरकरांना त्यांच्या शेवटच्या काळात सांभाळायचे होते, त्यांची सेवा करायची होती पण त्यालाही परवानगी मिळाली नाही. त्यांना बाबाराव सावरकरांचे अंतदर्शन सुद्धा घेता आले नाही.

Swatantra Veer Savarkar
Savarkar Row : सावरकरांना ब्रिटिशांकडून पेन्शन का मिळायची'? नाना पटोलेंचा सवाल

या कालावधीत त्यांनी भाषण, लेखन, आंदोलने, हिंदु संघटन, अस्पृश्यता निर्मुलन, व्यायामप्रसार, स्वदेशीचा आग्रह असे विविध कार्यक्रम राबवले. नाशिक ही सावरकांची जन्मभूमी असली तरी रत्नागिरी ही सावरकरांची एका अर्थानं कर्मभूमी होती. ही बाब देखील महत्त्वाची.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()