Andheri Byelection: ठरलं! शिंदे गट थेट मैदानात नाहीच, भाजपकडून उमेदवार जाहीर

andheri byelection bjp candidate muruji patel declared against shivsena rutuja latke eknath shinde
andheri byelection bjp candidate muruji patel declared against shivsena rutuja latke eknath shinde
Updated on

मुंबई: मागील काही दिवसांपासून अंधेरी पोटनिवडणूकीवरून राज्यातील राजकारण तापलं आहे, उद्या निवडणूक उमेदवारीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, यादरम्यान उद्या ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे अर्ज दाखल करणार आहेत. भाजपकडून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरूध्द भाजपचे मुरजी पटेल असा सामना पाहायला मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान वर्षा येथे भाजप नेते आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये ही जागा भाजपला सोडण्यावर दोन्ही बाजूने एकमत झाले. मुरजी पटेल हे कमळ या चिन्हावर अंधेरी निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे अंधेरी विधानसभा पोटनिवडणीकीत मशाल विरूद्ध कमळ अशी लढत आता पाहायला मिळणार आहे.

andheri byelection bjp candidate muruji patel declared against shivsena rutuja latke eknath shinde
Sushma Andhare: माझं ५ वर्षांचं बाळ शिवसेनेला दत्तक; सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?

ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा देत उद्या ११ वाजेपर्यंत लटके यांचा राजीनामा स्विकारल्याचं पत्र द्या असा आदेश महापालिकेला दिला. कोर्टाच्या या निर्णयानंतर ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधत न्याय देवतेकडून मला न्याय मिळाला आहे. माझा न्यायदेवतेवर पुर्णपणे विश्वास होता अशी पहिली प्रतिक्रीया दिली.

तसेच त्यांनी माझे पती रमेश लटके यांनी जे कार्य केलेलं आहे. त्याचा जो वारसा आहे तो पुढे घेऊन जाणार आहे असेही त्या म्हणाल्या. पालिकेकडून भ्रष्टाचाराचा आरोप केला यावर तुमचं मत काय विचारल असता, लटके यांनी अधिक बोलेने टाळले, मला याबद्दल काही कल्पना नाही. तुम्ही यासंदर्भात वकिलांशी बोलू शकता अशी प्रतिक्रिया लटके यांनी दिली आहे

andheri byelection bjp candidate muruji patel declared against shivsena rutuja latke eknath shinde
Viral Video: मुख्यमंत्र्यांनी PM मोदींच्या शेजारी बसूनच खिशातून काढली पुडी अन्...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.