शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधानामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमिवर बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात खोचक वक्तव्य केली असल्याची चर्चा आहे. (Andheri East Assembly by election Eknath Shinde Chandrakant Patil maharashtra politics)
पंढपुर येथील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. दरम्यान, पक्षात पडलेल्या उभ्या फुटीनंतर शिंदेगट आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्ष आणि पक्षचिन्हावरून निवडणूक आयोगापासून न्यायालयापर्यंत लढाई सुरू आहे.
दरम्यान, आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व या विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने आले आहे. पण अजूनही शिंदे गटाला पक्षाचे चिन्ह न मिळाल्यामुळे सस्पेन्स निर्माण झाला आहे.
यासर्वाविषयी माध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना काही प्रश्न विचारले असता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लोकप्रियतावरुन टोमणा हाणला आहे. 'एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता किती वाढली हे दसरा मेळाव्यात समजेल. तसेच, आणि ही जी पोटनिवडणुक लागली आहे त्याच्यातही मुख्यमंत्री शिंदेंची लोकप्रियता दिसेल. राजकीय निवडणुक आहे. त्यामुळे सगळंच दिसेल''. अशी प्रतिक्रिया पाटील यांनी यावेळी दिली.
त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळाच उटल सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे मुंबईतील अंधेरी पूर्व भागामध्ये पोटनिवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.