Angarki Sankashti Chaturthi: संकष्टीच्या उपवासाला चालणारा बटाटा भारतात कधी आला

बटाटा भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग
Angarki Sankashti chaturthi
Angarki Sankashti chaturthi esakal
Updated on

Angarki Sankashti chaturthi : बटाटा .भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग. बटाटा नसता तर पुण्यातले सगळे मेस बंद पडतील. आज अंगारकी चतुर्थीच्या उपवासाला चालणाऱ्या पदार्थात बटाटा तर महत्वाचा. बटाटा नसेल तर अनेक जण उपवास करणार सुद्धा नाहीत.

Angarki Sankashti chaturthi
Parenting Tips: पालकांच्या अति काळजीमुळे बिघडतेय तरुण पिढी? या चुका टाळा

अशा वेळी प्रश्न पडतो धर्मकारण, अर्थकारणासोबत जोडला गेलेला हा बटाटा मुळात स्वदेशी आहे का. गोरगरिबांच्या घरातील प्रमुख भाजी कोणती असेल तर ती बटाटा. श्रीमंताच्या ताटातील मेन्यूतही त्याला स्थान आहेच.

भारतीय जीवनाशी एकरूप झालेले हे बटाटे मूळचे आहे परदेशी. हे पीक दक्षिण अमेरिकेच्या ‘पेरू’मधील असल्याचे समाजशास्त्रज्ञ सांगतात. आज आम्ही तुम्हालाबटाट्याची ही रंजक गोष्ट सांगणार आहे, शेवटी बटाटा भारतात कसा पोहोचला आणि कोणत्या देशात पहिल्यांदा त्याची लागवड झाली.

Angarki Sankashti chaturthi
Parenting Tips: आईवडिलांमधील भांडण 'नॉर्मल' समजणं बंद करा, मुलांवर होतात हे परिणाम

दक्षिण अमेरिकेत बटाट्याची लागवड

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, दक्षिण अमेरिकेतील अँडीजमध्ये 8,000 वर्षांपूर्वी बटाट्याची लागवड सुरू झाली होती.ते 1500 नंतर युरोपमध्ये आणले गेले.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की अमेरिकेतील इडाहोचे शेतकरी आणि इटलीचे लोक बटाट्यावर पेरूइतकाच दावा करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेरूच्या लोकांना 16 व्या शतकापर्यंत बटाटे माहित होते. पेरूचीराजधानी लिमाच्या उपनगरात बनवलेल्या या केंद्रात बटाट्याचे हजारो नमुने सापडलेआहेत.

Angarki Sankashti chaturthi
Angarki Chaturthi : अंगारकी चतुर्थी निमित्त फराळासाठी बनवा खास उपवसाची इडली

बटाटा भारतात कसा आला?

कॅरिबियन बेटावरबटाट्याची लागवड सुरू झाल्याचा दावा केला जातो. तेव्हा बटाटा कमटा आणि बटाटा म्हणून ओळखला जायचा. १६व्या शतकात बटाटा स्पेनला पोहोचला.

तेथून युरोपात पोहोचल्यावर बटाटा नाव पटातो झाले. एका अहवालानुसार, कोलंबस जेव्हा जगभराच्या प्रवासाला निघाला तेव्हा त्याने बटाटे आपल्यासोबत वेगवेगळ्या खंडात नेले. पण पोर्तुगीज आणि डच व्यापाऱ्यांनी बटाटे भारतात आणल्याचा दावा केला जातो.

Angarki Sankashti chaturthi
Bone Health : सावधान ! हे पदार्थ तुमची हाडे खिळखिळी करतात

तथापि, भारतात बटाट्याच्या प्रचाराचे श्रेय वॉरन हेस्टिंग्स यांना जाते , जे 1772 ते 1785 पर्यंत भारताचे गव्हर्नर जनरल होते. आज बटाटा हे तांदूळ, गहू आणि मका नंतर जगातील चौथे महत्त्वाचे पीक बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.