शरद पवारांचे वाईट दिवस सुरू; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

शरद पवारांंनी सुरक्षेसाठी राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी - अनिल बोंडे
अनिल बोंडे
अनिल बोंडेगुगल
Updated on
Summary

शरद पवारांंनी सुरक्षेसाठी राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी - अनिल बोंडे

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असून मोठ्या प्रमाणात कर्मचारी शरद पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाले. यावेळी त्यांच्याकडून बंगल्यावर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली आहे. अचानक एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून कोर्टाचा निर्णय मान्य नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. या संपूर्ण परिस्थितीला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या घटनेनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, आता भाजपाचे नेते अनिल बोंडे यांनी यासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शरद पवारांचे शेवटचे वाईट दिवस सुरू झाले आहे. त्यामुळे स्वत:च्या सुरक्षेसाठी त्यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

अनिल बोंडे
शरद पवार हाय हाय... एसटी कर्मचाऱ्यांची 'सिल्व्हर ओक'वर चप्पलफेक

नेते अनिल बोंडे यांनी ट्विट करत राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, शरद पवारांचे शेवटचे दिवस वाईट सुरू झाले आहे. फ्रान्सच्या राजाला जनतेने भर चौकात फाशी दिली होती. त्याचीच थोडीफार पुनरावृत्ती महाराष्ट्रमध्ये होत आहे. राज्यात माझीच सुरक्षा नाही तर जनतेच काय? त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी असं शरद पवार यांनी जाहीर केले पाहिजे, असं त्यांनी सुचवलं आहे.

अनिल बोंडे
'सेना नेत्यांनी कुणाचे पैसे कुठं गुंतवलेत हे माझ्याइतकं कुणालाच माहित नाही'

काय म्हणालेत अनिल बोंडे ट्विटमध्ये

शरद पवार यांचे शेवटचे दिवस वाईट सुरू झाले आहेत. फ्रेंच क्रांतीमध्ये राजाला शेतकऱ्यांनी कामगारांनी चौकात आणून फासावर दिले होते. त्याची थोड्याफार प्रमाणात पुनरावृत्ती पाहायला मिळत आहे. संतप्त एसटीचे कामगार पाच महिन्यापासून संपावर आहेत. ते संतप्तरित्या शरद पवार यांच्या घरात घुसले असून त्यांनी पोलिसांनाही जुमानलेलं नाही. पाच महिन्यापासून पगार, घरी किराणामाल नसणारे आणि 125 कर्मचाऱ्यांची आत्महत्या झालेले हे कामगार आहेत. परंतु दुर्दैवानं हे सरकार अंहकारी झालं आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे पाच महिन्याच्या संपाने काय फायदा झाला अशी प्रतिक्रिया देतात. ईडीची नोटीस आली म्हणून संजय राऊत मिरवणूक काढतात. नबाब मलिक यांचा दाऊदशी संबंध असतानाही, आम्ही राजीनामा घेणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण जनता खवळली आहे. यातच पाच महिन्यापासून एसटी कर्मचारी दुःख झेलणार आणि शेवटी हाय कोर्टाच्या निकालानंतर अपमानित होणारे कामगारांना माहीत आहे की सरकार फक्त शरद पवार यांच्या विचारांनी चालते. त्यामुळे पवारांना जोपर्यंत हालवत नाही तोपर्यंत सरकार हालणार नाही हे कर्मचाऱ्यांना माहीत आहे. त्यामुळे शरद पवार स्वतःच्या कृतीमुळे ही अराजकता निर्माण झाली आहे. आता महाराष्ट्रातले शेतकरी किंवा कामगार पवारांवर केव्हा तुटून पडतील याचा नेम नाही. त्यामुळे शरद पवरांनी सुरक्षेसाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची शिफारस त्यांनी करायला हवी असा सल्ला अनिल बोंडे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.