अमरावती शहरातील लव्ह जिहादच्या प्रकरणामुळे वातावरण चांगलेच तापले असतानाच एका आदिवासी तरुणीची लव्ह जिहाद मधून हत्या झाल्याचा आरोप भाजपचे अनिल बोंडे यांनी केला आहे. चिखलदरा तालुक्यातील कोटमी येथील 19 वर्षे युवतीला 20 जुलै रोजी परतवाडा येथील शाहरुख उर्फ जकिर याने पळवून पुण्याला घेऊन गेला.
गावात पंचायत बसल्यानंतर पळवून घेऊन गेलेल्या मुलीला पुण्यात राहत असलेल्या आदिवासी युवकांच्या मदतीने 17 ऑगस्टला गावात परत आणले. 18 ऑगस्ट रोजी जाकीर उर्फ शाहरुख त्याच्या मित्राला घेऊन गावात आला आणि मुलीला आपल्या दुचाकी वर घेऊन गेला.
गावकऱ्यांना 19 ऑगस्टला रात्री गावातील विहिरीत या मुलीचा मृतदेह आढळला. परतवाडा येथील शाहरुख उर्फ जाकीर या तरुणाने आपल्या एका मित्राच्या सहाय्याने माझ्या मुलीची हत्या केली अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी चिखलदरा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मात्र पोलिसांना या प्रकरणात कुठलीही कारवाई न केल्याने या घटनेची तक्रार खासदार अनिल बोंडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
चिखलदरा पोलीस या युवतीच्या हत्येचे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे. बोंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे तसेच या बाबीची तक्रार गृहमंत्री यांच्याकडे सुद्धा केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.