Anil Deshmukh: युक्तिवाद, जामीन, स्थगिती...; न्यायालयात काय घडलं? देशमुखांच्या वकिलांनी सांगितलं!

जामीन मिळूनही अनिल देशमुखांचा मुक्काम अजून १० दिवस कोठडीतच आहे.
Anil Deshmukh
Anil DeshmukhSakal
Updated on

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे. मात्र तरीही त्यांना आणखी १० दिवस तुरुंगाबाहेर येता येणार नाही. अनिल देशमुखांच्या वकिलांनी न्यायालयातला युक्तिवाद आणि देशमुखांची सुटका याविषयी माहिती दिली आहे.

Anil Deshmukh
Anil Deshmukh : अटीशर्तीसह माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात जामीन मंजूर

अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांचे वकील अनिकेत कदम यांनी युक्तिवादाबद्दल माहिती दिली आहे. कदम म्हणाले, "आम्ही आमच्या युक्तिवादामध्ये त्यांच्या आरोग्याचा मुद्दा मांडला. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत आहे. आम्ही न्यायालयासमोर त्यांच्या तब्येतीबद्दलचे सगळे रिपोर्ट्स सादर केले. आम्ही या आदेशाला पुढे आव्हान देऊ असं सीबीआयने सांगितलं, त्यानंतर न्यायालयाने त्यांना मंजुरी दिली आणि त्यामुळे आता जामिनाच्या आदेशावर १० दिवसांची स्थगिती आली आहे, अशी माहिती अनिल देशमुखांचे वकील अॅडव्होकेट अनिकेत निकम यांनी दिली आहे".

Anil Deshmukh
Anil Deshmukh : जामीन मिळूनही अनिल देशमुख कोठडीतच; CBI ने १० दिवस थांबवलं!

अनिल देशमुख यांना एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर काही वेळातच सीबीआयने निर्णयाला आव्हान दिल्यानं अजून १० दिवस देशमुखांचा मुक्काम कोठडीतच आहे. दरम्यान, त्यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या घराबाहेर ढोलताशे वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.