मुंबई : शंभर कोटी वसुलीच्या आरोपात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Money Laundering Case) अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. आज त्यांची कोठडी संपणार होती. पण, न्यायालयानं अजून १४ दिवसानं कोठडीत वाढ केली आहे. देशमुख ८० दिवसांपासून कोठडीत आहेत.
मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या घरावर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाने छापेमारी केली. देशमुख बरेच दिवस अज्ञातवासात होते. शेवटी ते स्वतःच ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली होती. गेल्या ८० दिवसांपासून देशमुख कोठडीत आहेत. गेल्या १० जानेवारीला न्यायालयानं देशमुखांच्या कोठडीत १० दिवसांची वाढ केली होती. त्यानुसार आज त्यांची कोठडी संपणार होती. मात्र, न्यायालयानं त्यांच्या कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ केली आहे. सध्या देशमुख हे ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर यांनी केला होता. यानंतर सचिन वाझेवर देखील कारवाई करण्यात आली होती. तसेच देशमुखांच्या खासगी सचिवांना देखील अटक करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.