नागपूर : अजित पवार यांनी आज एका जाहीर कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडींबाबत गोप्यस्फोट केले. यामध्ये त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील आमच्यासोबत येणार होते पण त्यांना सध्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपद हवं होतं, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या दाव्यावर आता अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Anil Deshmukh explanation on Ajit Pawar claim that he also was coming with us for join govt)
देशमुख म्हणाले, "तुम्हाला जे खाते पाहिजे ते आम्ही देतो पण तुम्ही आमच्यासोबत या अशी ऑफर मला होती. परंतू ८३ वर्षाच्या बापाला सोडून मी कधीच येणार नाही, असं मी ठामपणे अजितदादांना सांगितलं होतं"
अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणं मी अनेक बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत उपस्थित होतो. पण या बैठकांमध्ये मी नेहमीच सांगत होतो की, शरद पवार साहेबांना या वयात आपण असे चुकीचे निर्णय घेवून त्रास देवून नका.
ज्या दिवशी यांचा शपथविधी होता त्या दिवशी मी पुण्याला होतो. मला अनेक फोन येत होते की, मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी तुम्ही या. पण ज्या पक्षानं खोट्या आरोपांखाली मला त्रास दिला त्या भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच नव्हता. अजितदादा आज जे काही सांगत त्यांना हे सांगण्यासाठी ६ महिने का लागले? असा सवालही यावेळी देशमुखांनी उपस्थित केला. तसेच अजित पवारांनी कर्जत इथल्या मेळाव्यात जे काही वक्तव्य केलं ते चुकीचं असल्याचंही अनिल देशमुख म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.