Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीतला जागावाटपाचा तिढा होणार दूर? 'हा' असणार नवा प्लॅन

Latest Maharashtra News: विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्याचा देखील दावा यावेळी करण्यात आला.
Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadisakal
Updated on

Latest Political News: महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये जिथे तिढा आहे तिथे तटस्थ संस्थेच्या अहवालाच्या माध्यमातून मार्ग काढता येईल का, याबाबत विचार सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच, विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्याचा देखील दावा यावेळी करण्यात आला.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची बैठक आज सलग तिसऱ्या दिवशी देखील मुंबईत पार पडली. उद्यादेखील (शनिवार) ‘मविआ’चे नेते सकाळी भेटणार आहेत. तिढा असलेल्या जागांवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून एक एजन्सी नेमून कोणत्या पक्षाची जास्त ताकद आहे

Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi: विदर्भातल्या या जागेसाठी ठाकरे - काँग्रेस येणार आमने सामने? एका मतदारसंघासाठी दोघेही आग्रही

हे जाणून घेऊन अंतिम निर्णय शेवटच्या टप्प्यात घेतला जाणार असल्याची माहिती बैठकीनंतर अनिल देशमुख यांनी दिली. मात्र याबाबतही अंतिम निर्णय शनिवारच्या बैठकीत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आजच्या बैठकीत १२०-१३० जागांवर चर्चा झाली, या जागांवर सहमती देखील झाल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या अधिकांश जागा त्याच पक्षाला देण्यात आलेल्या आहेत, मात्र जवळपास १० ते २० टक्के जागांवर सहमतीने अदलाबदली केली जाण्याची शक्यता आहे.

Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi : पुतळा दुर्घटनेची चौकशी करा ; महाविकास आघाडीची मागणी

‘चर्चा शहांच्या उपस्थितीतच’

महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत आघाडी आणि युतीत अंतर्गत सुंदोपसुंदी सुरु असताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात महायुतीमधील निर्णयाला वेग येईल, असे मानले जाते आहे. २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या शहा यांच्या उपस्थितीतील बैठकीपूर्वी प्रत्येक पक्षाने आपापला गृहपाठ सुरु केला आहे. भाजपने १६० जागांची मागणी केली असताना शिंदे गटाने संपूर्ण राज्यात आम्हाला अनुकूल वातावरण असल्याची भाषा सुरू केली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला किमान १० ते २० जागा अधिक हव्यात अशी भूमिका घेतली आहे.

Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीने वातावरण कलूषित करत जिंकल्या जागा, माजी आमदाराचा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.