१०० कोटी वसुली प्रकरण: अनिल देशमुखांना पुन्हा ED चे समन्स

१०० कोटी वसुली प्रकरण: अनिल देशमुखांना पुन्हा ED चे समन्स अनिल देशमुखांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी झाला होता व्हायरल Anil Deshmukh summoned by ED again in 100 crore extortion case from bars in Mumbai Sachin Waze Case vjb 91
anil deshmukh
anil deshmukhe sakal
Updated on

अनिल देशमुखांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी झाला होता व्हायरल

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) पुन्हा समन्स पाठवले आहे. देशमुख यांना सोमवारी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी देशमुख यांना तीन वेळा ईडीने समन्स बजावून चौकशीस उपस्थित राहण्यास सांगितले होते. याशिवाय त्यांचा मुलगा ऋषीकेश यालाही ईडीने समन्स बजावले आहे. (Anil Deshmukh summoned by ED again in 100 crore extortion case from bars in Mumbai Sachin Waze Case)

anil deshmukh
अनिल देशमुख गायब असल्याच्या चर्चा रंगताच 'तो' VIDEO व्हायरल

परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. अनिल देशमुख तत्कालीन पोलिस अधिकारी सचिन वाझे याला वसुली करायला सांगत होते. देशमुख यांनी वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीच टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. याबाबत परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होते. त्या पत्राच्या आधारावर मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. त्या जनहित याचिकेत मुंबई हायकोर्टाने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. याबाबत वाझेला प्रश्न विचारण्यात आल्याचे समजले. वाझेकडील या माहितीची पडताळणी परमबीर सिंग यांच्याकडून करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Anil Deshmukh
Anil Deshmukh
anil deshmukh
Breaking: अनिल देशमुख गायब, फोन 'नॉट रिचेबल'; ED कडून शोध सुरू

याप्रकरणी नुकतीच ईडीने न्यायालयाकडे वाझेची चौकशी करण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयाने त्याला परवानगी दिली आहे. ईडीचे अधिकारी तळोजा जेलमध्ये जाऊन सचिन वाझे याची चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वीही तळोजा कारागृहात 19 मे व 21 मेला वाझेचे स्टेटमेंट ईडीने रेकॉर्ड केले होते. त्यात त्याने अनेक खळबळजन दावे केले होते. त्या दाव्यांच्या आधारावरच ईडीने देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदेने व खासगी सचिव संजीव पालांडे यांना अटक केली होती. ईडीच्या गुन्ह्यांविरोधात देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने ईडीपासून कोणतेही संरक्षण देशमुख यांना दिले नाही. याप्रकरणाची पुढील सुनावणी 3 ऑगस्टला होणार आहे. त्यापूर्व शुक्रवाारी ईडीने देशमुख यांना समन्स बजावले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()