Anil Deshmukh : चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक करा ;अनिल देशमुख यांची मागणी,‘क्लीन चिट’ असल्याने दडपल्याचा आरोप

न्यायाधीश चांदीवाल यांनी माझ्यावरील आरोपांच्या चौकशीचा एक हजार ४०० पानांचा अहवाल राज्य सरकारकडे दोन वर्षांपूर्वी सादर केला आहे. परंतु, हा अहवाल राज्य सरकार लोकांसमोर येऊ देत नाही.
Anil Deshmukh
Anil Deshmukhsakal
Updated on

नागपूर : न्यायाधीश चांदीवाल यांनी माझ्यावरील आरोपांच्या चौकशीचा एक हजार ४०० पानांचा अहवाल राज्य सरकारकडे दोन वर्षांपूर्वी सादर केला आहे. परंतु, हा अहवाल राज्य सरकार लोकांसमोर येऊ देत नाही. मी अनेक वेळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक करण्यासाठी विनंती केली आहे. या अहवालात मला ‘क्लीन चीट’ असल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रसार माध्यमांमध्ये होत्या. मला ‘क्लीन चीट’ असल्यामुळेच फडणवीस यांनी हा अहवाल दडवून ठेवला आहे, असा आरोप आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. हा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणीही त्यांनी केली.

‘‘मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीरसिंग आणि सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांची न्यायाधीश चांदीवाल यांनी ११ महिने चौकशी केली. या चौकशी दरम्यान सचिन वाझे यांनी उलट तपासणीत कोर्टामध्ये स्पष्टपणे सांगितले होते की, अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पी.ए.ने मला पैसे मागितले नाही आणि मी त्यांना कधी पैसे दिले नाहीत. आता तेच आरोप करीत आहेत, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या कुबड्यांवर राजकीय सूडबुद्धीने फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्याची वेळ आली आहे,’’ असे देशमुख म्हणाले.

दोन खुनांच्या गुन्ह्यातील आरोपी सचिन वाझे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून माझ्यावर जुनाच तीन वर्षांपूर्वीचा आरोप करीत आहे. फडणवीस यांची हिंमत असेल तर त्यांनी चांदीवाल यांनी सादर केलेला चौकशी अहवाल लोकांसमोर आणावा, असे आव्हानही त्यांनी दिले.

माझ्यावरचे आरोप ‘ऐकीव’

न्या. चांदीवाल यांच्या आयोगाने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांना बोलविले होते. परंतु, सहा वेळा समन्स पाठवून ते आले नाहीत. शेवटी पकड वॉरंट काढल्यावर त्यांनी वकिलामार्फत शपथपत्र लिहून दिले की मी अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप ऐकीव माहितीवर होते. त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाहीत, असेही देशमुख यांनी सांगितले.

अहवाल मविआच्या काळातीलच : फडणवीस

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज चांदीवाल आयोगावरून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. त्यानंतर फडणवीस यांनी त्यांना

प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले, ‘‘चांदीवाल आयोगाचा अहवाल महाविकास आघाडीच्या काळात आला होता. मग तो अहवाल प्रसिद्ध का गेला नाही? याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे. मुळात परमवीरसिंग यांना महाविकास आघाडीने मुंबईचे पोलिस आयुक्त केले होते. अनिल देशमुख हे गृहमंत्री

असताना त्यांनी आरोप केले होते. खरे तर विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून एखादा पोलिस आयुक्त गृहमंत्र्यांवर आरोप कसे करेल? त्यामुळे या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी आहेत. यात काहीही अर्थ नाही.’’ असे फडणवीस म्हणाले.

‘‘अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या सांगण्यावरूनच हे प्रकरण ‘सीबीआय’कडे हस्तांतर करण्यात आले होते. यात केंद्र सरकारचा काहीही संबंध नव्हता. त्यावेळी न्यायालयाने जे आदेश दिले, ते बघितले तर या सर्व गोष्टी स्पष्ट होतील ,’’ असेही फडणवीस म्हणाले.

देशमुखांची नार्को टेस्ट करावी : बावनकुळे

‘‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इतरांना उपद्रव देण्याची गरज नाही. ते प्रामाणिकपणे काम करतात. याउलट अनिल देशमुख यांनी आरोप करण्याऐवजी नार्को टेस्ट करण्याची तयारी दाखवावी, अशी जनतेची मागणी आहे. सचिन वाझे खोटे बोलत असेल तर जनतेला नार्को टेस्टमधून कळेल असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनिल देशमुखांना प्रत्युत्तर दिले. देशमुख यांनी आरोप-प्रत्यारोप करू नये तर चौकशीची मागणी करून त्याला सामोर जावे, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.