राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आज विधानसभेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनादरम्यान गिरीष महाजन यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला असल्याचे गंभीर आरोप केले. यावेळी अनिल गोटे यांच्यावरही काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यावर अनिल गोटे म्हणाले की, यंत्रणांचा गैरवापर जसा तुम्ही केला तसा तेही करत असतील. हायकोर्टाने तुमच्यावरही ताशेरे ओढले असं म्हणत तुम्लाहा बोलण्याचा काय अधिकार आहे? असा सवाल फडणवीसांनी केला.
फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर बोलताना गोटे म्हणाले की, इन्कमटॅक्स, ईडी, सीबीआय यांची नावं कधी ऐकली होती का? ते सध्या यांच्या घरी धुणं धूत असल्यासारखा हे वापर करत आहेत. आता मी सुद्धा तक्रार दिली आहे की, आरकेडब्लू ही राकेश कुमार वाधवानच्या मालकीची कंपनी, या कंपनीने २०१४-१५ मध्ये १० आणि २०१८-१९ मध्ये १० कोटी रुपये भाजपला दिले. पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक बुडवली तो राकेश वाधवान, त्याची चौकशी सुरु होती त्यावेळी. त्याची चौकशी थांबवण्यासाठी देणगी दिली का? आपण याला चौकशी म्हणत नाही, खंडणी म्हणतो असं गोटे म्हणाले. निवडणूक आयोगाच्या साईटवर याबद्दलचे तपशील आहेत. भाजप म्हणतंय आम्ही विकासकांकडून घेतले, तो तर इकबाल मिर्चीचा पार्टनर आहे. म्हणजे तुम्हीही आरोपी झाले पाहिजे असं गोटे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.