अनिल परबांकडून सोमय्यांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा!

मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
Anil Parab_Kirit Somaiya
Anil Parab_Kirit Somaiya
Updated on

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजप नेते किरिट सोमय्या यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीची खटला दाखल केला आहे. सातत्यानं द्वेषपूर्ण आणि बदनामीकारक विधानं केल्याबद्दल मुंबई हायकोर्टात हा खटला दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीच परब यांनी सोमय्या यांना नोटीस पाठवून तीन दिवसांत माफी मागा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल असा इशारा दिला होता.

अनिल परब यांनी बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती गोळा केली असल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी केला होता. तासगाव येथील वंजारवाडीत परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या फार्महाऊसची पाहाणी किरिट सोमय्या यांनी नुकतीच केली. दरम्यान, खरमाटे यांना ईडीने समन्सही बजावलं होतं. ईडीच्या अधिकाऱ्यांकडे ७५० कोटी रुपयांच्या बेकायदा संपत्ती असल्याची माहिती असल्याचंही सोमय्या यांनी यावेळी सांगितलं होतं. यानंतर आता अनिल परबांचंह काऊंटडाऊन सुरु झालंय असंही ते म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.