Anil Parab : रामदास कदमांनी घोटाळे केल्याचा अनिल परबांचा आरोप; सोमय्यांकडे देणार पुरावे

कदमांनीच खेडचं प्रकरण सोमय्यांकडे दिलं होतं. त्यामुळे सोमय्यांनीच हेही प्रकरण तडीस न्यावं, अशी आमची मागणी असल्याचं परब म्हणाले. कदमांच्या विरोधात मी जिल्हाधिकारी आणि संबंधित कार्यालयांकडे पाठपुरावा करणार असल्याचही ते म्हणाले.
Anil Parab
Anil Parabesakal
Updated on

Shiv sena anil parab : ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यातलं राजकीय वैर दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसून येत आहे. अनिल परब यांनी मंगळवारी रामदास कदमांचा घोटाळा बाहेर काढला असून सगळे पुरावे किरीट सोमय्या यांच्याकडे देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अनिल परब म्हणाले की, रामदास कदम यांनी शासकीय पदाचा वापर करुन गैरव्यवहार केला आहे. आज दोन प्रकरण किरीट सोमय्यांना देतो आहे. येत्या काही काळात बारा ते तेरा प्रकरण बाहेर काढणार असून सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी रामदास कदम आणि त्यांच्या दोन मुलांना जेलमध्ये टाकावं.

Anil Parab
पत्नीने पती व सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार करणे क्रूरता नव्हे, हायकोर्टाची टिप्पणी

परब पुढे म्हणाले, रामदास कदम यांच्या मुलाला प्रदूषण महामंडळ दिलेलं आहे, जे निकषात बसत नाही. तरीही दिलेलं आहे. पूररेषेच्या आतमध्ये असलेलं बांधकाम महामंडळाच्या अध्यक्षांनी केलेलं आहे. किरीट सोमय्यांनी याची दखल घ्यावी. नागडा पोपट म्हणून सोमय्यांचा उल्लेख होतोय, हा पोपट सगळीकडे उडत उडत फिरतोय.. ज्या पद्धतीने महाराष्ट्राने तुम्हाला बघितलं आहे.. जरा घराच्यांची तरी कदर करा. दुसरा कुणी असता तर लाजेने बाहेर पडला नसता.

''आम्हाला बघायचंय सोमय्यांची किती ताकद आहे, कदमांच्या विरोधात काय करतात ते बघूयात. रस्त्यासाठी १५ गुंठे जागा दिली परंतु १८ गुंठ्याचे पैसे घेतले.. मंत्रिपदाचा गैरफायदा घेतला. त्यामुळे कदमांवर कारवाई झाली पाहिजे. सोमय्या हे महाराष्ट्राचे तथाकथित अण्णा हजारे आहेत, यात लक्ष घालतील का, हाच प्रश्न आहे.''

Anil Parab
Ramdev Baba : ''आम्ही माफी मागतो'' दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरुन रामदेव बाबांची सपशेल माघार, स्वतःच कोर्टात पोहोचले

खेडच्या प्रकरणात रामदास कदमांनी पुढाकार घेतला होता. कदमांनीच खेडचं प्रकरण सोमय्यांकडे दिलं होतं. त्यामुळे सोमय्यांनीच हे प्रकरण तडीस न्यावं, अशी आमची मागणी असल्याचं परब म्हणाले. कदमांच्या विरोधात मी जिल्हाधिकारी आणि संबंधित कार्यालयांकडे पाठपुरावा करणार असल्याचही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.