Unseasonal Rain Damage: संकटकाळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे; अनिल पाटील यांची ग्वाही

anil patil
anil patilesakal
Updated on

Unseasonal Rain Damage : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. या संकटाच्या परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे मदत, पुनर्वसन आणि आपत्ती निवारणमंत्री अनिल भाईदास पाटील यांनी म्हटले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी रविवार (ता. २६)पासून अवकाळी आणि गारपीट सुरू आहे. जिथे नुकसान झाले आहे, त्या सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी सरकारने चर्चा केली आहे. (Anil Patil statement During crisis state government stood firmly behind farmers news )

आवश्यक त्या सूचना दिल्या गेल्या आहेत. अजूनही काही ठिकाणी अवकाळी, गारपिटीची शक्यता असल्याने सतत लक्ष ठेवून राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्या सर्व ठिकाणांचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संकटकाळात दिली. त्यामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्यवेळी योग्य मदत तातडीने पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

anil patil
Unseasonal Rain Damage : साहेब, अवकाळीमुळे होत्याचे नव्हते झाले; शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल सरकारकडे पाठविण्याच्या सूचना अग्रक्रमाने देण्यात आल्या. तीन जिल्ह्यांमध्ये आधीच ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यात नाशिक, जळगाव आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांच्या प्रशासकीय प्रमुखांना ही माहिती पूर्वीच देण्यात आली होती. अवकाळी आणि अतिवृष्टी अशी दोन्ही परिस्थिती सध्या निर्माण झाली असून, राज्य सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

"नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. मंगळवारी (ता. २८) नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त तालुक्यांना भेटी देईन. या वेळी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेणार आहे. प्रत्यक्ष शेतांवर जाऊन नुकसानीचा आढावा घेऊ." - अनिल भाईदास पाटील, मदत, पुनर्वसन तथा आपत्ती निवारणमंत्री

anil patil
Nashik Unseasonal Rain Damage: 33 हजार हेक्टरला अवकाळीचा तडाखा; सर्वाधिक फटका द्राक्ष पंढरीला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.