High Court on Pets : मुकी जनावरं काहींकरीता कुटुंबसदस्य असतीलही, पण...; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

High Court on Pets
High Court on Petsesakal
Updated on

मुंबईः अनेक कुटुंबामध्ये मुक्या प्राण्यांना कुटुंबसदस्याप्रमाणे वागवलं जातं. त्यांना हवं-नको ते सगळं बघितलं जातं, त्यांचे लाडही पुरवले जातात. परंतु मुंबई हायकोर्टाने पाळीव प्राण्यांबद्दल एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

एका प्रकरणात दुचाकीला धडक लागून भटक्या कुत्र्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आयपीसीच्या कलमांनुसार एका व्यक्तीवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचाः ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

हे प्रकरण मुंबई हायकोर्टापर्यंत गेलं. कोर्टाने आज या प्रकरणामध्ये निकाल दिलेला असून पोलिसांनाच धारेवर धरलं आहे. मुकी जनावरं काहींकरीता कुटुंबसदस्य असली तरी ते मनुष्यप्राणी नाहीत, असं वर्डिंग कोर्टाने केलं आहे. या प्रकरणातला एफआयआर रद्द करुन पोलिसांना दंडही ठोठावण्यात आला.

High Court on Pets
Chitra Wagh : चाकणकरांना पदावर राहण्याचा अधिकार नाही; उर्फी प्रकरणावरुन वाघ आक्रमक

भटक्या कुत्र्याच्या मृत्यू प्रकरणात आयपीसीची चुकीची कलमं लावण्याप्रकरणी मुंबई पोलिस अधिकाऱ्याला २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. हायकोर्टाच्या या निर्णयान सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.