'हिंगणघाट निर्भयाच्या परीवाराला दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा'

चित्रा वाघ यांनी या कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी केली आहे.
Chitra Wagh
Chitra Wagh sakal
Updated on

हिंगणघाट: हिंगणघाटच्या निर्भयाची २ वर्षांची न्यायाची प्रतीक्षा आज अखेर संपुष्टात येईल. थोडी जरी संवेदना शिल्लक असेल तर त्या परीवाराला दिलेला शब्द तात्काळ पुर्ण करा अशी मागणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे. प्रा. अंकिता पिसुड्डे हिला भरचौकात पेट्रोल ओतून जाळल्याच्या प्रकरणात आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरविले आहे.

आरोपीने पेट्रोल ओतून पेटवून दिल्यानंतर आठ दिवसांनी म्हणजे १० फेब्रुवारीला नागपुरात उपचारादरम्यान अंकिताचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कोर्ट आरोपीला आज संध्याकाळी पाचला शिक्षा सुनावणार आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राज्यभरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. चित्रा वाघ (Chitra Wagh)यांनी या कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी केली आहे.

Summary

आरोपीने पेट्रोल ओतून पेटवून दिल्यानंतर आठ दिवसांनी नागपुरात उपचारादरम्यान अंकिताचा मृत्यू झाला होता.

Chitra Wagh
Nitesh Rane News : सिंधुदुर्गात दहशत चालणार नाही; राणेंना इशारा

चित्रा वाघ ट्विट करत म्हणाल्या, हिंगणघाटच्या निर्भयाची २ वर्षांची न्यायाची प्रतीक्षा आज अखेर संपुष्टात येईल.पण शासनाने तिच्या परीवाराला दिलेल्या लेखी आश्वासन पुर्तीची प्रतिक्षा मात्र अद्याप संपलेली नाही. मुख्यमंत्री महोदय, थोडी जरी संवेदना शिल्लक असेल तर तात्काळ त्या परीवाराला दिलेला शब्द पुर्ण करा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

आरोपीतर्फे तीन वकीलपत्र

या प्रकरणाची प्रारंभीची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश माजगावकर यांच्यासमोर झाली. त्यानंतर न्यायाधीश राहुल भागवत यांच्यासमोर हे प्रकरण चालले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली. सुरवातीच्या काळात सरकारी वकील प्रसाद सोइतकर यांनी व नंतर अॅड. दीपक वैद्य यांनी त्यांना सहकार्य केले. आरोपीच्या वतीने न्यायालयात अॅड. भूपेंद्र सोने, अॅड. ढेकले आणि नागपूर येथील आणखी एक वकील असा तिघांचे वकीलपत्र सादर झाले होते. त्यामुळे न्यायालयाने नेमका वकील कोण, याची विचारणा आरोपीला केली व त्याने सांगितल्यानुसार अॅड. भूपेंद्र सोने यांनी आरोपीतर्फे काम पाहिले. न्याय मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून न्यायालयाने कोरोना काळातही सुनावणी सुरू ठेवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.