Shikhar Bank Case : शिखर बँक गैरव्यवहारप्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत वाढ; क्लिनचीटवर अण्णा हजारेंचा आक्षेप

Anna Hazare on Shikhar Bank Case : पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व माणिकराव जाधव यांनी आक्षेप घेतला असून याविरोधात सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.
Anna Hazare on Shikhar Bank Case
Anna Hazare on Shikhar Bank CaseEsakal
Updated on

कोट्यवधींच्या शिखर बँक गैरव्यवहारप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व माणिकराव जाधव यांनी आक्षेप घेतला असून याविरोधात सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी विशेष सत्र न्या. राहुल रोकडे यांनी अर्जदारांना निषेध याचिका दाखल करण्यास वेळ दिला असून २९ जूनला पुढील सुनावणी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

शिखर बँकेने २००५ ते २०१० या कालावधीत मोठ्या प्रमाणात कर्जाचे वाटप केले होते. राज्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, कारखाने आणि इतर कंपन्यांना हे कर्ज देण्यात आले होते. मात्र, ही सर्व कर्जे बुडीत निघाली. याप्रकरणी शिखर बँक संचालकपदी असलेल्या अजित पवार यांच्यासह अन्य ७० जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. आहे.

यापुर्वी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २५ हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. यामध्ये कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्री संबंधी बँकेला नुकसान झाल्याचे कोणतेच पुरावे नसल्याचं आर्थिक गुन्हे शाखेनं सांगितलं होतं.

Anna Hazare on Shikhar Bank Case
Chhagan Bhujbal: मला खासदार व्हायची इच्छा आहे, म्हणूनच...; भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलं

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली. मात्र, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. गुरुवारी (ता. १३) विशेष सत्र न्या. राहुल रोकडे यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी अण्णा हजारे आणि जाधव यांच्या वकिलांनी निषेध याचिका दाखल करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला आहे.

त्यानुसार न्यायालयाने अर्जदारांना वेळ देत २९ जूनला पुढील सुनावणी ठेवली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. २९ जूनला कोर्ट काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Anna Hazare on Shikhar Bank Case
Ajit Pawar: 'आरएसएस'च्या मुखपत्रात लेख लिहून खळबळ उडवून देणाऱ्या रतन शारदांना भाजप नेत्यांचे फोन; अजित पवारांबद्दलही केलं मोठं विधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.