शरद पवारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करा; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पक्षश्रेष्ठींना सल्ला

देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.
Prithviraj Chavan Sonia Gandhi
Prithviraj Chavan Sonia Gandhiesakal
Updated on
Summary

देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.

देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत असतानाच महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत मोठं विधान केलंय. त्यामुळं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. आज पंतप्रधानपदाचा उमेदवार कॉंग्रेसकडं (Congress) नसेल, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचं नाव समोर करून सर्वपक्षीय ऐक्य साधलं गेलं पाहिजे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना दिलाय. ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) थोपवण्यासाठी सर्व भाजपेत्तर (BJP) पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. आजही कॉंग्रेसचा देशातील 20 टक्के जनाधार कायम आहे. तो वाढवता यायला हवा. प्रादेशिक पक्ष कॉंग्रेससारखे देशव्यापी नाहीत. पण, आज पंतप्रधानपदाचा उमेदवार कॉंग्रेसकडं नसेल, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचं नाव समोर करून सर्वपक्षीय ऐक्य साधायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.

Prithviraj Chavan Sonia Gandhi
पक्षानं आखली रणनीती, साताऱ्यातून भाजपचाच खासदार निवडून येणार; 'या' आमदारानं व्यक्त केला विश्वास

'घरातल्या बाबी चव्हाट्यावर मांडण्यात आल्या'

पंतप्रधान मोदींच्या दमनकारी धोरणापासून देश वाचवायची गरज लक्षात घेत कॉंग्रेसनं पक्षांतर्गत असणारे प्रश्न तातडीनं सोडवावेत. आझाद यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर चिंतन करावं आणि कारभारात सुधारणा करावी, असंही चव्हाण यांनी सुचविलं. चव्हाण पुढं म्हणाले, आम्ही 23 जणांनी पक्षाध्यक्षाच्या निवडणुकीबाबत ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी करणारं पत्र लिहिलं होतं. पक्षनेतृत्वाला लिहिलेलं हे पत्र ‘लीक’ करण्यात आलं. पक्ष वाचवण्याच्या प्रयत्नांची दखल घेत सुधारणा करण्याऐवजी घरातल्या बाबी चव्हाट्यावर मांडण्यात आल्या, असं व्हायला नको होतं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Prithviraj Chavan Sonia Gandhi
आझादांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; तेलंगणात माजी खासदाराचा राजीनामा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.