Sambhaji Bhide Controversy : संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्याला एक लाखाच्या बक्षिसाची घोषणा

Sambhaji Bhide
Sambhaji Bhideesakal
Updated on

Mumbai News : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे कायम या-ना त्या कारणाने चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत एक विधान करुन वाद ओढावून घेतला होता. त्यांच्या विधानानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

संतापलेल्या समता परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्याने संभाजी भिड यांची मिशी कापणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. समता परिषदेचे माजी जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी भिडेंची मिशी कापणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं आहे.

संभाजी भिडे यांनी देशात अशांतता पसरवण्याचं काम सुरु केलं आहे. भिडे हे महापुरुषांबाबत दररोज वेगवेगळे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे भिडेंची मिशी कापणाऱ्याला ओबीसी समाजाकडून वर्गणी करून एक लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. 'साम टीव्ही'ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

Sambhaji Bhide
PM Modi Pune Visit : मागच्या भेटीत पुण्यासाठी मोदींनी केल्या 'या' घोषणा; उद्याच्या दौऱ्यात काय मिळणार?

संभाजी भिडेंनी काय म्हटलं होतं?

अमरावतीच्या बडनेर इथं झालेल्या कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडेंनी महात्मा गांधींचे वडील करमचंद गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. करमचंद गांधी हे मोहनदास अर्थात गांधीजींचे खरे वडील नसून ते एका मुस्लीम जमीनदाराचे पुत्र होते, असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं होतं.

इतकेच नाही तर मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकानं केल्याचा दावादेखील भिडेंनी केला होता. दरम्यान, या विधानामुळं मोठं वादंग निर्माण झालं आहे. काँग्रेस नेते आक्रमक झाले असून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. भिडेंविरोधात अमरावतीमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे.

Sambhaji Bhide
MP Imtiaz Jaleel : अतिउत्साही मंत्र्यांनी बुडविले शहराचे तब्बल सात कोटी

आणखी एक क्लिप व्हायरल

'साम टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, महात्मा गांधी यांच्या पितृत्वाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि महाराष्ट्राबरोबरचं भारतभर ज्यांना पुजलं जातं अशा साईबाबांविषयी अपमानकारक उद्गार काढले आहेत.

या कथित ऑडियो क्लिपमध्ये संभाजी भिडे म्हणाले की, "इंग्रजांनी ज्यांना xxxx समाजसुधारकांच्या पदव्या बहाल केल्या, फुले देखील त्याच यादीतले."

संभाजी भिडे यांनी शिर्डीच्या साईबाबांबद्दल देखील आक्षेपार्ह उद्गार काढले. ते म्हणाले, "आपला हिंदू समाज साईबाबांना पुजतो, त्या साईबाबांना देव्हाऱ्यातून काढा."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.